पुणे-
गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी देणाऱ्या तसेच ससुन हॉस्पिटल येथून पळून जाणाऱ्या मार्शल लुईस लीलाकर याला आज अटक करण्यात आली. त्याला येरवडा येथून त्याच्या मावशीच्या घरातून अटक करण्यात आली, ही कामगिरी सायबर पोलीस स्टेशनने केली.
लुईस याला स्वाती मोहोळ यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 11 फेब्रुवारी रोजी तो उपचारादरम्यान ससुन हॉस्पिटल येथून पळून गेला. क्राईम ब्रँच तसेच सायबर पोलीस स्टेशन कडून शोध चालू होता. आरोपीच्या तपासासाठी नेरळ व कर्जत येथे तपास पथके रवाना करण्यात आली होती.आज तो मावशीला भेटायला आला असता तेथे अगोदरच तैनात असलेल्या सायबर पोलीस स्टेशनच्या स्टाफने त्यास ताब्यात घेतले. त्याच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर नंबर 44 /2024 कलम 224 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सायबर पोलिसानी त्याला बंडगार्डन पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.