गुलाल उधळला, प्रश्न सुटला सांगितले….आता पुन्हा ते उपोषणास बसले ,याचा अर्थ सरकारकडून फसवणूक झाली.
दोन तासाच्या आत काय परिस्थिती आहे ते जनतेसह आमच्यासमोर आणि जरांगे पाटलांच्या समोर येऊ द्या.
सातारा-मनोज जरांगेंच्या जीविताला धोका झाल्यास जबाबदारी कोणाची?, असा स्पष्ट सवाल काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्र सरकराने आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा. हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेला पाहू द्या. हा अहवाल विधीमंडळात ठेवण्याची आवश्यकता नाही विधीमंडळापेक्षा राज्यातील जनता सर्वोच्च आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले जरांगेंचे नवी मुंबईत उपोषण सोडले गेले. गुलाल उधळला गेला. प्रश्न सुटला गेले असे सांगितले गेले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितले ते सांगावे. मराठा आरक्षणाची स्पष्टता झाली पाहिजे. आज पुन्हा ते उपोषणास बसले आहेत. याचा अर्थ सरकारकडून त्यांची फसवणूक झाली आहे.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जरांगे पाटील यांची तब्बेत नाजुक आहे, त्यामूळे तोबडतोब मार्ग काढा. दोन तासाच्या आत काय परिस्थिती आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसह आमच्यासमोर आणि जरांगे पाटलांच्या समोर येऊ द्या. त्यासाठी 20 तारखेची वाट कशाला पाहता, अशात त्यांच्या जिवीताला धोका झाला तर जबाबदारी कोणाची असणार असा प्रश्न सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा सामाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर संताप व्यक्त करण्यात आला. लोणावळा येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय शिबिराच्या पहिल्याच दिवशी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टिका केली आहे.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तातडीने वेबसाईटवर टाकून जनतेसमोर आणावा आणि अध्यादेश काढावा, त्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनाची गरज नसल्याचे सांगूण मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर चव्हाण यांनी संताप व्यक्त केला.

