पुणे : अरण्येश्वर येथील एकता मित्र मंडळ (ट्रस्ट) आणि वंचित विकास संस्थेच्या वतीने मागील वर्षी प्रमाणे यंदाचाही गणेश जन्मोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा झाला.
महिलांच्या सन्मानासाठी अभया (एकल) महिलांच्या हस्ते गणेशयाग पूजन केले.
एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले, उपाध्यक्ष विनायक इंगवले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एकता महिला मंडळ आणि वंचित विकास संस्थेच्या तेजस्विनी थिटे, मीनाक्षी नवले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. या वेळी मीनाताई कुर्लेकर आणि सुनीताताई जोगळेकर यांचे मंडळाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
अभयांचा गणेशयाग समाजात महत्त्वाचा संदेश रुजवत आहे. महिलांमधील न्यूनगंड, एकटेपणा आणि कमीपणाची भावना नष्ट करून सर्वांसोबत सन्मानाने वावरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे मीनाताई कुर्लेकर आणि अध्यक्ष सुधीर ढमाले यांनी सांगितले.