मुंबई-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही आज भाजपत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजप प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर मंगळवारी त्यांनी मुंबई स्थित भाजप कार्यालयात जाऊन केंद्रातील सत्ताधारी भगव्या पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे सहकारी अमर राजूरकर यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. या दोघांव्यतिरिक्त अन्य कुणीही भाजपचे कमळ हाती घेतले नाही. पण येत्या काही दिवसांत चव्हाण यांचे अनेक समर्थक भाजपत प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.
भाजप प्रवेशावेळी अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करण्याची उपस्थितांना ग्वाही दिली. आज माझ्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत बदल झाला. मी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. यापुढे मी मोदींची स्फूर्ती व प्रेरणा घेऊन काम करेल, असे ते म्हणाले.
गेली तीन दशके काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे, बालपणापासूनच काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा हात सोडत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला.मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू, काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. यासाठी खूप विचार करावा लागला. काही गोष्टी देशासाठी आणि राज्यासाठी चांगल्या होत असतील तर निर्णय घ्यावा असे वाटल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, मी पक्षासाठी योगदान दिले. मी पार्टी वाढवण्यासाठी काम केले त्यामुळे टीका करणे योग्य नाही.सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिकपणे केले. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी संबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करेन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही.
मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही
अशोक चव्हाण म्हणाले की, विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपमध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे. राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे. माझा अनुभव पणाला लावेल. राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलत आहेत. काही समर्थन करत आहेत. पण मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही. मला बावनकुळे यांनी पक्षप्रवेश दिला. मी फिस दिली, उधार ठेवली नाही.माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलताना अडखळल्याचे दिसून आले. सवयीप्रमाणे अशोक चव्हाण यांनी अनावधानाने काँग्रेस असा उल्लेख केला. आशिष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई भाजप अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असे म्हटले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी चूक दुरुस्त करत मुंबई भाजप अध्यक्ष असे म्हटले आणि सभागृहात एकच हशा पिकला.
हा माझा व्यक्तिगत निर्णय – अशोक चव्हाण
मी कधीही कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही आणि करणार नाही. सभागृहात विरोधी भूमिका मी प्रमाणिक पणे केली. सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांशी सबंध होते ती एक परंपरा आहे. पक्ष जे आदेश देतील ते मला मान्य असतील. जे मला सांगितले जाईल त्यानुसार मी काम करीन. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मला कुणी जा असे सांगितले नाही. मी अधिक भाष्य करणार नाही, योग्य वेळी बोलीन, असे अशोक चव्हाण म्हणाले.