हडपसर गाडीतळावर चोरट्यांचे साम्राज्य – सर्वाधिक चोऱ्यांचा हॉटस्पॉट:पोलिसांचे दुर्लक्ष
पुणे- हडपसर गाडीतळावर सर्वाधिक चोऱ्या नोंदविल्या जात असून या ठिकाणावर जणू चोरट्यांचे साम्राज्य निर्माण झाले कि काय ? असा प्रश्न उपस्थित होईल एवढ्या चोऱ्या येथे होऊ लागल्या आहेत.पुणे-सोलापुर रस्त्यावर अतिथी हॉटेलच्या समोर गाडीतळ हडपसर, पुणे येथील गतिरोधका जवळ एक ४३ वर्षाची महिला मोपेडवरून सकाळी सव्वा आठ वाजता जात असताना तिची बॅॅग खाली पडली आणि तिने ती उचलायच्या आत एका जोडप्याने ती उचलून पळविली , माझी बॅॅग,माझी बॅॅग.. म्हणून हि महिला ओरडली पण या दोघांनी हि बॅॅग घेऊन पोबारा केला. या बैगेत ३,२५,०००/-रु किचे सोन्याचे दागिने व कॉलेजची इतर महत्वाची कागदपत्रे होती . पोलीस अंमलदार, खामगळ ७३७८३०३७८० या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.