पुणे-कोंढवा परिसरात आशिर्वाद चौक येथे रस्त्याने पत्नीसह सायंकाळी साडेचार वाजता पायी जात असलेल्या सौदी अरेबियाचे एका नागरिकास कार मधून आलेल्या अज्ञात आरोपींनी ते पोलिस असल्याची बतावणी केली. त्याच्या जवळील वस्तू तपासणीकरिता घेऊन आरोपींनी गाडीसह पोबारा करत, सौदी अरेबियाचे नागरिकाची तब्बल चार लाख 79 हजारांची लूट केली आहे. याप्रकरणी अनोळखी गाडी चालक व गाडीतील इतर अनाेळखी साथीदारांवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत साहेल ओथमान एहमद (वय-52, रा. मिठानगर, कोंढवा, पुणे) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार साहेल एहमद हे त्यांचे पत्नीसह काेंढव्याती अाशिर्वाद चाैक परिसरात पायी फिरत हाेते. त्यावेळी एक चारचाकी गाडी त्यांचे जवळ येऊन उभी राहिली व गाडीत बसलेल्या अनाेळखी चालकाने अरबी भाषेत तक्रारदार यांच्याशी बाेलणे करुन पाेलीस असल्याची बतावणी केली.
तक्रारदार यांचेकडे असणाऱ्या वस्तूंची, अाेळखपत्रांची पडताळणी करावयाची आहे असे सांगितले. ओळखपत्र दाखवल्यासारखे भासवून त्यांचा विश्वास संपादन करुन खिशातील कागदपत्रे, पैसे तक्रारदार दाखवत असताना, अाराेपींनी कागदपत्रांचा व पैशाचा नाकाने वास घेऊन, तपासात असल्याचे भासवून तक्रारदार यांना काही समजण्याचे अात वेगाने गाडी घेऊन निघून जाऊन एक लाख ७७ हजार रुपयांचे साैदी रियाल चलन, दाेन लाख ४९ हजारांचे अमेरिकन डाॅलर. ५३ हजार रुपये भारतीय चलन असा एकूण चार लाख ७९ हजारांची मुद्देमाल चाेरी करुन अार्थिक फसवणुक केली अाहे. याबाबत पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक पुजा पाटील(7767053927) करत आहे.