पुणे-येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायाच्या प्रतीक्षेतील एका ३० वर्षीय आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी निदर्शनास आले आहे.मंगेश विठ्ठल भोर(वय ३० वर्षे रा. हिवरे बु. कैलास नगर, ता. जुन्नर, जि. पुणे) असे या आरोपीचे नाव असून
ओतुर पोलीस स्टेशन गु.र.नं-३२/२०२३, भा.द.वि कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ मध्ये जिल्हा न्यायाधीश तथा अति. सत्र न्यायाधीश, खेड राजगुरुनगर, जि. पुणे यांचे आदेशान्वये दि.१६.०७.२०२३ पासून न्यायाधीन बंदी म्हणुन या कारागृहात त्यास ठेवण्यात आले होते
दि.१२.०२.२०२४ रोजी सकाळी ०७.२५ वा. दरम्यान न्या. बंदी क्र.४२२०/२४ मंगेश विठ्ठल भोर याने त्यास बंदीस ठेवण्यात आलेल्या कारागृह रुग्णालय विभागाच्या मेडीकल स्टोअरच्या बाजुच्या पडवीत टॉवलेच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे अधिकारी / कर्मचारी व बंद्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सदर बंद्यास तात्काळ कारागृह रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मंगेश विठ्ठल भोर याची तपासणी केली असता मयत झाल्याचे सकाळी ०७.३५ वा. घोषीत केले.
मंगेश विठ्ठल भोर हा कारागृह रुग्णालयात कारागृह मानसोपचार तज्ञ यांचे निगराणीखाली मानसिक आजारावरील उपचाराकरीता उपचार्थ दाखल होता. यापूर्वी त्याने दि.१९.०७.२०२३ रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.या घटनेबाबत मंगेश विठ्ठल भोर याचे नातेवाईकास कळवुन संबंधीत स्थानिक येरवडा पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्युची नोंद करुन तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, पुणे शहर यांचेमार्फत इन्क्वेस्ट पंचानामा व पुढील कार्यवाही सुरु आहे.असे येरवडा कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.