पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाआहे. चव्हाणांनी मात्र आपण कुठल्याच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे सुपुत्र आणि आमदार विश्वजीत कदम यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा रंगू लागली. परंतु कदमांनी या चर्चा उडवून लावत मतदारसंघातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचं सांगितलं आहे.
“अशोक चव्हाण यांनी अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्याची बातमी माध्यमांतून समजली. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या बातमीने मला वेदना झाल्या आहेत. परंतु वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे, की विश्वजीत कदम यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु मी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.” असं विश्वजीत कदम म्हणाले.