पुणे-मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आज भारत इतिहास संशोधक मंडळास भेट दिली व मंडळास बाबरी मशिदीचा भाग असणारी एक वीट भेट दिली त्याच बरोबर मंडळास २५ लाख रुपये देणगी दिली .
आज दुपारी राजसाहेब ठाकरे यांनी मंडळास भेट देत तिथे असलेल्या अनेक दुर्मिळ ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली.या वेळी मंडळाचे प्रदीपदादा रावत पांडुरंग बलकवडे सहीत अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
त्या वेळी या ठिकाणी असलेल्या पुण्येश्र्वर व नारायनेश्र्वर मंदिराच्या अवशेषांची विशेष पाहणी राजसाहेब ठाकरे यांनी करत संपूर्ण इतिहास पुन्हा एकदा समजून घेतला व मनसे पदाधिकाऱ्यांना मनसे देत असलेल्या पुण्येश्र्वर व नारायनेश्र्वर लढ्या बाबतची विचारणा केली .मनसे गेली काही वर्ष सातत्याने पुण्येश्र्वर व नारायनेश्र्वर मंदिराच्या ठिकाणी सर्वेक्षण व उत्खनन करावे या साठी प्रयत्न करत आहे. व मंदिर मुक्ततेसाठी जनआंदोलन उभे करणार आहे.
या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर,अविनाश अभ्यंकर सहीत पुणे शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.