वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह 43 आंदोलकांवर गुन्हा
‘निर्भय बनो’ कार्यक्रमात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने वागळे,आयोजक आणि पब्लिकवर देखील कारवाई
पोलिसांमधील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यावर अकार्यक्षमतेबाबत कारवाई नाही
पुणे- राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारकाच्या सभागृहात निर्भय बनो कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण 200 ते 250 जणांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे.यापूर्वी वागळे यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंसह 43 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला . त्यानंतर आता निर्भया बनो या कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ झाला.
या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले आहे. पहिला गुन्हा हा आंदोलनकर्ते आणि गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे तर दुसरा गुन्हा आयोजक, निखिल वागळे, महायुती आणि महाविकास आघाडी या सगळ्या 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमस्थळाजवळ जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. या आदेशाचे उल्लंघन करुन हे सगळे कार्यकर्ते सभास्थळी जमले होते. त्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीफोड केली, शाईफेक केली यामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. तर महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी दोघेही आमनेसामने आल्याने गोंधळ झाला. पोलिसांच्या आदेशाचे आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस बंदोबदस्त असतानाही गाडी चारही बाजूने फोडली
भाजपकडून होत असलेल्या कडाडून विरोधानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात वागळे यांच्या अंगावरही शाई फेकण्यात आलाय. पोलिस बंदोबंदास्त प्रवास होत असतानाही गाडी चारी बाजूने फोडण्यात आली आहे. यामध्ये काही तरुणीसुद्धा जखमी झाल्या आहेत. कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांनी या हल्ल्याचा निषेध केला.पत्रकार निखिल वागळे यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह विधान ट्वीटकेले होते. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षातील कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी निखिल वागळेंना विरोध करताना कायदा हाथी घेतला.याप्रकरणी पोलीस आयुक्तांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांना या तणावाची माहिती असताना देखील पोलिसांना जबादारीने परिस्थिती हाताळण्यात अपयश आले याबाबत कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर मात्र ठपका ठेवण्यात आलेला नाही.
पहा कोणाकोणावर आहेत गुन्हे दाखल आणि कोण आहे फिर्यादी …..
आता २१ वर्षीय तरुणीने केलेल्या फिर्यादीनुसार