तब्बल १६,९९५ नागरिकांनी दिली भेट, ४१७३ नागरिकांनी घेतला लाभ
पुणे : शासनाने राबविलेल्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता आयोजिलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ छ. शिवाजीनगर मतदारसंघात २२ ठिकाणी काढण्यात आली. यामध्ये तब्बल १६,९९५ नागरिकांनी भेट दिली, तर ४१७३ नागरिकांनी योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. याकरिता छ. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुढाकार घेतला होता.
यात्रेदरम्यान प्रामुख्याने प्रधानमंत्री स्वनिधी योजना, आरोग्य तपासणी शिबीर, प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड योजना, उज्ज्वला कार्ड योजना, आधार अपडेट, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, शहरी गरीब योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अण्णा सुरक्षा योजना, मेरी कहानी मेरी जुबानी, विश्वकर्मा खादी ग्रामोद्योग, स्वच्छ अशा विविध योजनांची माहिती देत योजनांचा प्रत्यक्षपणे लाभ नागरिकांना करून देण्यात आला.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, लोककल्याणकारी मोदी सरकारच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी व्हावी, याकरिता ही यात्रा काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्याच्या उद्देशाने छ. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी स्टॉल्स लावून सलग १४ दिवस ही यात्रा सुरु होती. याकरिता पुणे मनपाचे सर्व अधिकारी व भाजपा पदाधिका-यांनी मोठे परिश्रम घेतले, असेही त्यांनी सांगितले.
शिवाजीनगर भागातील ज्ञानेश्वर पादुका चौक, कामाला नेहरू पार्क, चित्तरंजन वाटिका गार्डन, शिवाजीनगर गावठाण, पुणे मनपा बस थांबा, छ. संभाजी महाराज उद्यान, गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वार, ओम सुपर मार्केट एरिया, खैरेवाडी, बारामती गेस्ट हाऊस, पांडवनगर, पुणे कस्तुरबा वसाहत, फर्ग्युसन महाविद्यालय कॅम्पस, पाटील इस्टेट, पीएमसी कॉलनी वाकडेवाडी, गोखलेनगर शाळा, वैदुवादी, भोसलेनगर रेंजहिल्स, छ. शिवाजीनगर बस थांबा, रेल्वे स्टेशन, मनपा भवन परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेबाबत जनजागृती व माहिती देण्यात आली.
या यात्रेमध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांसह, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, उपायुक्त श्री. संतोष वारुळे, सहाय्यक आयुक्त रवींद्र खंदारे, विजय भोईर, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक राहुल डोके, रामदास चव्हाण, संदीप कोळपे, राजेंद्र मोरे, पांडुरंग महाडिक, दिपक कदम, मंगला मारतकर यासोबतच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी राष्ट्रीय सचिव भाजप सुनिल देवधर , माजी नगरसेवक. निलीमा खाडे, दत्ता खाडे , स्वाती लोखंडे, आदित्य माळवे , राजश्री काळे , रविंद्र साळेगावकर, प्रकाश ढोरे, सुनील पांडे, गणेश बगाडे, आनंद छाजेड , योगेश बाचल ,प्रकाश सोलंकी , किरण ओरसे, डॉ. अजय दुधाणे, रोहन खोमणे, सचिन वाडेकर, अपर्णा कुऱ्हाडे, शैलेश बडदे , सतीश बहीरट, अपूर्व खाडे, सौरभ कुंडलिक, हेमंतडाबी, वीकासडाबी, प्रतुल जागडे, धर्मेश शहा, दुर्योधन भापकर, रविराज यादव, सुजित गोटेकर, शशीकांत नाईक आदि पधाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात्रा यशस्वी करण्यास प्रयत्न केले.