नवजात बालकांसाठी दळवी रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची मागणी-आ.सिद्धार्थ शिरोळे

Date:

पुणे – महानगरपालिकेच्या दळवी रुग्णालयात नवजात बालकांसाठी एनआयसीयू आणि आयसीयू यंत्रणा उभारण्याबाबत तसेच डॉ. होमी भाभा रुग्णालयाचे काम वेगाने सुरु करण्याबाबत आज (गुरुवारी) महापालिकेचे आरोग्य प्रमुख श्री भगवान पवार यांच्या बरोबर सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये सध्या महिला प्रसूतीगृहासाठी पुणे महानगरपालिकेचे दळवी प्रसूतिगृह उपलब्ध आहे. या प्रसुतीगृहाचा लाभ मुळारोड, पीएमसी कॉलनी, पाटील इस्टेट वसाहत, नरवीर तानाजी वाडी, भैय्यावाडी, छत्रपती शिवाजीनगर, गोखलेनगर या ठिकाणच्या गर्भवती महिला भगिनींना होतो.

दळवी हॉस्पिटलमध्ये मोठया प्रमाणात जागा उपलब्ध आहे. याठिकाणी नवजात बालकांसाठी एनआयसीयू आणि आयसीयू उपलब्ध नसल्यामुळे गर्भवती महिला भगिनींची खूप गैरसोय होते. येत्या काळात या हॉस्पिटलमध्ये नवजात बालकांसाठी माफक दरात एनआयसीयू आणि आयसीयू करण्यासाठी लवकरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचेकडे मागणी करणार आहे.

याबरोबरच हॉस्पिटलमध्ये उपकरणे, सेवकवर्ग, तज्ञ्ज डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वर्ग ४ कर्मचारी यांची देखील संख्या येणाऱ्या १५ दिवसांत वाढवणार आहे. या रुग्णालयात माफक दरात डायलिसीस सुरु करणार असून, याचा लाभ प्रामुख्याने वस्ती विभागात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना होईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

तसेच डॉ होमी भाभा रुग्णालयाचे काम वेगाने सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचेबरोबर सविस्तर बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आढावा बैठकीला सुभाषराव जेऊर, बिरू नाना खोमणे, बाळा राऊत, श्याम आप्पा सातपुते, लक्ष्मण लोखंडे, शांताराम धोत्रे, अतिरिक्त आयुक्त बिनवडे, आरोग्य प्रमुख भगवान पवार आदि उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिंदुजा कुटुंबाने 2026 मध्ये यूकेच्या श्रीमंतांच्या यादीत सलग पाचव्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले

पुणे- हिंदुजा ग्रुप या 111 वर्षे जुन्या बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे प्रतिनिधित्व करणारे संजय आणि धीरज हिंदुजा आणि कुटुंब यांनी 38 अब्ज पाऊंड संपत्तीसह सलग पाचव्या वर्षी संडे टाइम्स रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संडे टाइम्स रिच लिस्ट ही युनायटेड किंगडममध्ये वास्तव्यास असलेल्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांची अधिकृत वार्षिक क्रमवारी यादी आहे.  यामध्ये 2026 च्या यादीत सुमारे 350 जणांची नावे आहेत. जागतिक आव्हाने आणि धोरणात्मक बदल होत असूनही हिंदुजा कुटुंबाने उल्लेखनीय व्यावसायिक स्थैर्य आणि जागतिक नेतृत्व सातत्याने प्रदर्शित केले आहे. शतकाहून अधिक काळ, हिंदुजा ग्रुपचा प्रवास स्वर्गीय श्री. परमानंद दीपचंद हिंदुजा यांच्या “माझा धर्म म्हणजे असे कार्य करणे की ज्यामुळे मला इतरांना देता येईल,” या तत्त्वाच्या आधाराने  मार्गक्रमण करत आहे. हे तत्त्व आजही आर्थिक प्रगती, रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास आणि विविध बाजारपेठांमधील समुदायांवर सकारात्मक परिणाम यामध्ये योगदान देत व्यवसाय वृद्धीसोबत समतोल राखत समूहाच्या उद्योगधंद्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार देत आहे. हिंदुजा ग्रुप 38 देशांमध्ये कार्यरत असून दळणवळण, डिजिटल तंत्रज्ञान, बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रसारमाध्यमे, प्रकल्प विकास, ल्युब्रिकंट्स आणि स्पेशालिटी केमिकल्स, ऊर्जा, रिअल इस्टेट, ट्रेडिंग आणि आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये समूहाची गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात हिंदुजा ग्रुपने भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रावर आपले लक्ष अधिक केंद्रित केले असून वाहन चार्जिंग पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीसह शाश्वतता आणि भविष्याभिमुख नाविन्यपूर्णतेकडे धोरणात्मक वाटचाल दर्शवली आहे. व्यावसायिक साम्राज्याच्या पलीकडे हिंदुजा कुटुंब हिंदुजा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी देखील कटिबद्ध आहे. हे फाउंडेशन शिक्षण, आरोग्यसेवा, शाश्वत ग्रामीण विकास आणि जलसंधारण क्षेत्रातील परिवर्तनात्मक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते आणि विविध भौगोलिक क्षेत्रांतील समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकते. द संडे टाइम्स रिच लिस्ट 2026 मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मान्यवर आणि प्रतिष्ठित नावांमध्ये 27.971 अब्ज पाऊंड संपत्तीसह डेव्हिड आणि सायमन रुबेन आणि कुटुंब, 26.852 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर लिओनार्ड ब्लावातनिक, 24.481 अब्ज पाऊंड संपत्तीसह इदान ओफर, 18.939 अब्ज पाऊंड संपत्तीसह गाय, जॉर्ज, अलाना आणि गॅलेन वेस्टन आणि कुटुंब, 18.177 अब्ज पाऊंड संपत्तीसह ख्रिस्तोफर हार्बोन, 16.411 अब्ज पाऊंड संपत्तीसह निक स्टोरोन्स्की, 16.006 अब्ज पाऊंड संपत्तीसह अ‍ॅलेक्स गेर्को, 15.194 अब्ज पाऊंड संपत्तीसह सर जिम रॅटक्लिफ, तसेच 14.26 अब्ज पाऊंड संपत्तीसह इगोर आणि दिमित्री बुखमन यांचा समावेश आहे.

कविता हा अंतरात्म्याचा हुंकार, जाणिवांचा उद्गार – अंजली कुलकर्णी

जयश्री श्रोत्रिय लिखित ‘मनाचं आभाळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन पुणे : कविता...

विधान परिषदेचा बिगुल वाजला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर; 18 जूनला होणार मतदान

मुंबई-पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत आणखी भर पडणार असून,...