महा एनजीओ फेडरेशनचा पुढाकार ; आळंदी येथे गीताभक्ती अमृत महोत्सव सोहळ्यात प्रकाशन श्री श्री रविशंकर आणि गोविंद देव गिरी महाराज यांची उपस्थिती
पुणे : आळंदी येथे गीताभक्ती अमृत महोत्सव सोहळ्यात महा एनजीओ फेडरेशनच्या ‘नाते समाजाशी’ या पुस्तकाचे प्रकाशन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे २५०० सामाजिक संस्थांच्या कार्याचा परिचय असलेले पुस्तक महा एनजीओ फेडरेशन द्वारे प्रकाशित करण्यात आले.
यावेळी पूज्य साध्वी ऋतंबरा दीदी माँ, वृंदावनचे पूज्य संजीव कृष्ण ठाकूर महाराज, बिर्ला ग्रुपचे राजश्री बिर्ला, पूज्य चिन्नजिअर स्वामी जी, पूज्य श्री सुधांशु महाराज , सुधीर मुनगंटीवार, महेश लांडगे, राजेश मालपाणी, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यावेळी उपस्थित होते.
शेखर मुंदडा म्हणाले, ‘नाते समाजाशी’ या पुस्तकात समाजातील विविध घटकांसाठी काम करणाऱ्या संस्था, त्यांचे संपर्क, कामाचे स्वरुप अशी माहिती देण्यात आली आहे. या माध्यमातून समाजातील गरजू आणि मदत करु इच्छिणाऱ्या दानशूरांपर्यंत संस्थाची माहिती पोहचणार आहे, असेही त्यांनी सांगितले. महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद अण्णा शिंदे, संचालक अमोल उंबरजे, गणेश बाकले, योगेश बजाज, राहुल जगताप देखील यावेळी उपस्थित होते.