पुणे-शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह हटवण्यात आलं आहे. काल(मंगळवारी) निवडणूक आयोगाने घड्याळ हे पक्षचिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षाचे नाव अजित पवार गटाला दिलं आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह काढण्यात आलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शरद पवार गटाने त्यांच्या कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह हटवलं आहे, त्यामुळे आता पुण्यातील हे ऑफीस शरद पवार गटाचं आधिकृत ऑफीस झालं आहे. आज शरद पवार गटाने काही नवीन नावे आणि पक्ष चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केली. त्यानंतर आयोगाने त्यांच्याकडून तीन नावं मागवली होती त्यांपैकी निवडणूक आयोगानं शरद पवारांना ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं पक्षनाव दिलं आहे.