Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एमआयटी डब्ल्यूपीयूत  ‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ चे उद्घाटन

Date:

पुणे, दि. ६ फेब्रुवारी: ब्रह्मांड दर्शनाचे निरिक्षण व अध्ययनासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सच्या वतिने ‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ची निर्मिती एमआयटीच्या इकोपार्क टेकडीवर करण्यात आले. येथे एकूण तीन दुर्बीणी बसविण्यात आल्या आहेत. त्यात जीएसओच्या दोन दुर्बीण एक ८ इंच न्यूटोनियन आणि १० इंची रिचिक्रीशन या दोन्ही दुर्बीणी तायवान वरून आयात तसेच युनीस्टेलर इव्हीस्कोप टू ही दुर्बीण फ्रान्स या देशातून आयात करण्यात आली आहे.
इस्त्रोचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आलोक श्रीवास्तव आणि ज्योर्तिविद्या परिसंस्थेचे उपाध्यक्ष अनिरूध्द देशपांडे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते सोमवारी ‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आलोक श्रीवास्तव म्हणाले,”भविष्यात एमआयटी डब्ल्यूपीयू इस्त्रो सारखे उपग्रहावरील अवकाश वेधशाळा बनवू शकेल अशी आशा आहे. येथे चंद्र, तारे यांच्याबरोबरच ब्रह्मांडाचे दर्शन घडून ते विश्व समोर आणण्याचा प्रयत्न करतील.”
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले,”ही वेधशाळा पुण्यातील मध्यवस्तीत असल्याने जमीनवरील निरिक्षणासाठी अत्यंत महत्वाची आहे. या शाळेचा उपयोग विद्यार्थ्यांबरोबरच अन्य नागरिकांना होईल. ज्योर्तिविद्या परिसंस्था देशातील सर्वात जुनी संस्था असून याचा उपयोग पंचांग निर्मितीसाठी केला जातो.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” आज आम्ही ब्रह्मांडचे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतू संतांनी निसर्ग आणि जीवनासंदर्भात माहिती दिली.तसेच आत्म ज्ञानाचा परिचय करून दिला आहे. त्यातूनच आत्म साक्षात्कार आणि ब्रह्मांडाचे ज्ञान प्राप्त होते.”
प्रा.डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,” हा प्रकल्प अत्यंत अद्वितीय असून भविष्यात रॉयल सोसायटी फॉर लंडन अ‍ॅस्ट्रॉनॉमी कडून एमआयटीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फेलोशीप बरोबरच एक तरी नोबेल पुरस्काराचा विजेता बनेल यात शंका नाही. येथे अध्यात्मा बरोबरच विज्ञानाचा मेळ दिसून येतो.”
कॉसमॉस  ऍस्ट्रॉनॉमी क्लबच्या मार्गदर्शनात याची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थी सम्यक कोठारी, ओजस धुमाळ, अमेय अरगडे, तेजस कुलकर्णी, निरज वर्मा, ऋग्वेद अर्गे, रोहन संघई आणि रिचल अभंग यांच्या टीम ने हे कार्य केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील हा सर्वात मोठा विद्यार्थी प्रकल्प आहे. तसेच देशात कोणत्याही विद्यापीठामध्ये असा प्रकल्प सादर करण्यात आलेला नाही. असे प्रकल्प केवळ संशोधन केंद्रातच असतात.
यावेळी सम्यक कोठारी या विद्यार्थ्याने कॉसमॉस ऍस्ट्रोनॉमी क्लब व वेदशाळेची माहिती दिली. यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सीएओ डॉ. संजय कामतेकर, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. अनूप काळे व विष्णू भिसे हे उपस्थिती होते.
कॉसमॉस    ऍस्ट्रोनॉमी क्लबच्या समन्वयक प्रा.अनघा कर्णे यांनी प्रस्तावना मांडली.
डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले..

‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ची विशेषता
 या संदर्भात कॉसमॉस  ऍस्ट्रोनॉमी क्लबच्या समन्वयक प्रा.अनघा कर्णे यांनी सांगितले की, या वेधशाळेत बसविण्यात आलेले दो टेलीस्कोप हे संशोधनासाठी आणि एक दुर्बीण ही आकाश दर्शनासाठी बसविण्यात आली आहे. या वेधशाळेतून डीप स्काय इमेज घेता येईल. यामध्ये चंद्र, नेबूला, ग्रह, तारे, गॅलेक्सी, ५० हजार वर्षातून एकदा दिसणार्‍या धूमकेतूचे फोटो काढण्यात आले. त्याच प्रमाणे पिनव्हिल गॅलेक्सीमधील एसएन२०२३ आयएक्सएफ सूपर नोव्हा याचे निरिक्षण करण्यात आले. तसेच येथे विविध ग्रह तार्‍यांचा अभ्यास करण्यात येईल. तसेच वेगवेगळ्या संशोधन केंद्रांशी संपर्क साधून नव्या गोष्टींचे अवलोकन करण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे-साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११...

PMPML बसने चांदणी चौकात ६ खाजगी वाहनांना उडविले , ,PMPML आणि RTOबद्दल संताप,नागरिकांची चिंता आणि सुरक्षेचा प्रश्न

चांदणी चौकातील आपघातातील जखमींसाठी चंद्रकांतदादा सरसावले-जखमींवर उपचाराचा सर्व खर्च...

“पुण्यनगरीत सलोख्याचे दर्शन घडवत मंगल कलश रथयात्रेचे जल्लोषात स्वागत”

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे...