निलेश घायवळ, गजा मारणे, बाब बोडके, सचिन पोटे, गोरख काटे, अंदेकर टोळी, टिपू पठाण, जंगल्या सातपुते, खडा वसीम, अन्वर नववा या सराईत गुन्हेगारांना आज हजर करण्यात आले.
पुणे- पोलिस आयुक्तालयात गजा मारणे, बाबा बोडके, घायवळसह तीनशे सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. अमितेशकुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तांची सुत्रे हाताच घेतात हा कारवाईचा बडगा उगारला. शहरातील रेकॉर्डवरील सर्व गुंडांसह सराईत गुन्हेगारांची परेड घेत त्यांना सुचना देण्यात आल्या. गुन्हेगारीचे उद्दातीकरण करू नका, व्हाट्सअप स्टेस, रील बनवून दहशत निर्माण करू नका, अशा सूचना देत सर्वांना तंबी देण्यात आली.नूतन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत करण्यात आलं आहे. गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात हजेरी लावली आहे. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची आज ओळख परेड करण्यात आलीये. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे.
कुख्यात गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर, टिपू पठाण, कंचीले सचिन पोटे,अशा प्रमुख १५ गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या ५० टोळ्यांतील सुमारे २६७ अधिक सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलिस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलावण्यात आले होते.
कोणताही गुन्हा करायचा नाही. गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही. बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचे नाही, सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत. राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलिस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी या गुंडाना दिला आहे.