विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन समांरभ होणार संपन्न.
मुंबई दिनांक 6 फेब्रुवारी :- सार्वजनिक बांधकाम मंत्री उद्या बुधवार 7 फेब्रुवारी ते शुक्रवार 9 फेब्रुवारी पर्यंत सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर दौऱ्यावर येत असून या दौऱ्यामध्ये मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमीपुजन व नवीन वास्तूंचे उद्घाटन होणार आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग अखत्यारित विभागीय स्तरीय आढावा बैठक मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत.
7 फेब्रुवारी रोजी दुपारी 01.15 वाजता सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम मंडळ, सातारा अंतर्गत विविध विकास कामांबद्दल आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी 02.15 वाजता सैनिक स्कूल सातारा येथील बांधकाम प्रकल्पाची पाहाणी मंत्री चव्हाण करणार आहेत. त्यानंतर, दुपारी 02.45 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथील इमारत बांधकामाची पाहाणीही होणार आहे. दुपारी 03.00 वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विधानसभा मतदार संघात सातारा तालुक्यातील सोनगांव येथील नवीन पुलाचे लोकार्पण मंत्री चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 04.00 वाजता आमदार जयकुमार गोरे यांच्या विधानसभा मतदारसंघातील कराड तालुक्यामधील पार्ले येथे पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन व जाहिर सभा मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 05.15 वाजता कराड तालुक्यातील कापिल येथील अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन होणार आहे. तसेच, कापिल विविध कार्यकारी सेवा सोसायटी ला 100 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल शताब्दी महोत्सव कार्यक्रमास मंत्री चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 07.15 वाजता कराड तालुक्यातील वाठार येथे पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे व 2515 योजनेअंतर्गत मंजूर कामांचे भूमिपुजन समारंभ व जाहिर सभा मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली आहे.
8 फेब्रुवारी रोजी विटा-पेठ-मलकापूर-अणुस्करा रस्ता व कोकरुड-मलकापूर या रस्त्यांच्या कामांची पहाणी मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुपारी 03.00 वाजता कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम मंडळ, कोल्हापूर अंतर्गत विविध विकास कामांचा आढावा मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे. दुपारी 04.00 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूरच्या नुतनीकरण लोकार्पण कार्यक्रम व कोल्हापूर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आभासी पध्दतीने लोकार्पण व भूमीपुजन कार्यक्रम मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सायंकाळी 06.00 वाजता सांगली मधील हरिपूर कोथळी रस्त्यावरील कृष्णा नदीवरील मोठया पुलाचा लोकार्पण सोहळा मंत्री चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर, 06.45 वाजता मिरज शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, मिरज कार्यालय इमारतीचे भूमीपुजन सोहळा तसेच सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांच्या आभासी पध्दतीने लोकार्पण भूमीपुजन कार्यक्रम मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे.
9 फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पंढरपूर व सार्वजनिक बांधकाम उपविभाग (रोजगार हमी योजना), पंढरपूर या कार्यालयीन इमारतींचे भूमीपुजन श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत सकाळी 09.30 वाजता होणार आहे. त्यानंतर, सकाळी 10.00 वाजता (मायणी-दिघंची-महुद-पंढरपूर व जिल्हा हद्द पंढरपूर अंतर्गत पुर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा देखील होणार आहे. सकाळी 10.30 वाजता पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत प्रगती पथावर असलेल्या कामांचा आढावा तसेच सोलापूर जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आभासी पध्दतीने लोकार्पण व भूमीपुजन कार्यक्रमास मंत्री चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11.30 वाजता माळशिरस शासकीय विश्रामगृहाच्या नुतन इमारतीचे भूमीपुजन कार्यक्रम संपन्न होणार असून दुपारी 12.00 वाजता माळशिरस जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या कामाची पहाणी मंत्री चव्हाण करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता हॅम अंतर्गत कळंबोली-नातेपुते-शिंगणापूर या रस्त्यांच्या पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण मंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 04.00 वाजता बारामती मधील अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय ब-हाणपूर आणि बारामती-मेडद आयुर्वेद महाविद्यालय व बारामती बस स्टँण्ड कामांची पाहाणी मंत्री चव्हाण यावेळी करणार आहेत.