सासवड- येथील तहसीलदार कार्यालयाचे कुलुप अज्ञात व्यक्तींनी ताेडून कार्यालयातून ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या खाेलीतून ईव्हीएम मशीनचे एक डेमाे मशीन चाेरी करुन नेल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. या चाेरीची घटना तहसीलदार कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली असून त्याआधारे आराेपींची ओळख पटवून पुणे ग्रामीण पोलिसांकडून शाेध सुरु करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेले आहे.. ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिट चोरी गेले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे . यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
आगामी लाेकसभा निवडणूक लवकरच हाेणार असून त्याअनुषंगाने प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या असून साेमवारी रात्री तीन अज्ञात चाेरटयांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलुप कशाचेतरी सहाय्याने ताेडून खाेलीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी खाेलीत एका रॅकवर ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन पैकी एका डेमाे ईव्हीएम मशीन उचलून साेबत नेली. या घटनेची माहिती मिळताच, सासवड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यांना चाेरटयांनी ईव्हीएम मशीन पळवून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. त्याआधारे फरार झालेल्या तीन अज्ञात चाेरटयांचा माग पोलिस काढत आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले की, या गुन्हयाचे अनुषंगाने सासवड पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड तहसीलदार कार्यालयात एकूण 40 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले हाेते. परंतु तीन चाेरटयांन त्यापैकी केवळ एक ईव्हीएम डेमाे युनिट चाेरी करुन नेले आहे. नेमके काेणत्या कारणास्तव त्यांनी ईव्हीएम मशीन चाेरी केले याचा अद्याप उलगडा झालेला नाही. आराेपींचा शाेध घेण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहे.