जम्मू-काश्मिरात सतत बर्फवृष्टी होत आहे. दरम्यान, हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा जारी केला आहे. डोडा, किश्तवाड, पुंछ, रामबन, गंदेरबल, बांदीपूर, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे हिमस्खलन होण्याची शक्यता आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी (5 फेब्रुवारी) पर्यटकांना पुढील 24 तासांत या भागात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
हिमवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात तापमानात सातत्याने घसरण होत आहे. गुलमर्गमध्ये 5 फेब्रुवारीला किमान तापमान उणे 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. 4 फेब्रुवारी रोजी येथील तापमान उणे सात अंशांवर होते. काल रात्री पहलगाममध्ये किमान तापमान उणे 11.9 अंश सेल्सिअस होते.