सामान्य ज्ञान आणि कौशल्य प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्वेश गुरवचा प्रथम क्रमांक
पिंपरी, पुणे (दि. ५ फेब्रुवारी २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी विहान शर्मा याची महाराष्ट्र राज्याच्या १४ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली. नियमीतपणे अभ्यास आणि क्रिकेटचा सराव या मध्ये योग्य ताळमेळ राखून विहान ने यश संपादन केले.
तसेच ‘सहोदय पुणे सामान्य ज्ञान आणि २१ व्या शतकातील कौशल्य प्रश्नमंजुषा २०२४ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या इयत्ता नववीतील सर्वेश गुरव यांने प्रथम क्रमांक पटकावला. चिंचवड येथे अत्यंत स्पर्धात्मक आणि उत्साहात पार पडलेल्या स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत पुण्यातील ४५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीत भाग घेतला होता.
एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्वेश गुरव आणि विहान शर्मा यांचे अभिनंदन केले.