मी उमेदवार देईल त्याला मतदान करा
बारामती असी करणार कि मुलीचे बाप म्हणतील..मुलगी बारामतीतच द्यायची..आपली मुले म्हणतील..आता बास..
बारामती-लोकसभा निवडणुकीत बारामतीत काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीचा कौल कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीतून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. लवकरच महायुतीचा उमेदवार जाहीर होईल.मी उमेदवार आहे असं समजून तुम्ही मतदान करा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आता अजित पवार यांनीच थेट आपल्या विचाराचा उमेदवार देण्याचे जाहिर केले आहे. मीच उमेदवार आहे असे समजून बारामतीकरांनी मतदान करण्याचे थेट आवाहन अजित पवारांनी आज (रविवारी) बारामतीत केले.
बारामती त मुलगी द्यायची विषय आला कि मुलीचा बाप म्हणतो काय आहे बारामतीत…आपली बारामती अशी करणार आहे कि मुलींचे बाप म्हणतील बारामतीतच द्यायची मुलगी..आपली मुले म्हणतील आता नको…खूप झाल्या ..असेही वक्तव्य अजितदादांनी यावेळी भाषणातून केले.
कामाचा वेग कायम ठेवण्यासाठी मला सहकार्य करा. आधी जसा पाठिंबा दिलात, तसाच पाठिंबा यापुढेही द्या. तर यापुढेही तुमची कामं होतील. अन्यथा मी तुमच्या कामांना बांधील नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. स्पष्टवक्ता म्हणून मला महाराष्ट्र ओळखतो. मला बाकीचे उद्योग आहेत. तिथे मी इतकं काम केलं तर मी विमान, हेलिकॉप्टरनं फिरेन. मग मला सकाळी सातला उठून फिरण्याची पण गरज नाही. तुमच्या भागातील विकासाचं सातत्य टिकवायचं असेल, प्रगती सुधारणा व्हायची असेल तर आमच्या पाठिशी राहा, असं अजित पवार म्हणाले.