सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सविंदणे येथील ३४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

Date:

पुणे दि.३- राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिरुर तालुक्यातील मौजे सविंदणे येथील ३४ कोटी ५० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. शिरुर तालुक्यातील विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी श्री.वळसे पाटील यांनी दिली.

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाशराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, राजेंद्र गावडे, बाळासाहेब डांगे, सचिन पानसरे, सरपंच शुभांगी पडवळ आदी उपस्थित होते.

राज्य शासन महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मधील कालावधीत कोरोना नियंत्रणाला प्राधान्य दिल्याने विकासकामांची गती कमी होती. मात्र आता विकासकामांना वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते आणि पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याचे श्री.वळसे पाटील यावेळी म्हणाले.

मौजे सविंदणे येथे जलजीवन मिशन अंतर्गत २४ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना उभारण्यात येत आहे. मडके वस्ती येथील ओढ्यावरील पुल बांधणे १ कोटी ३८ लाख रुपये, जलसंधारण महामंडळा अंतर्गत गेटेड बंधारे २ कोटी ७१ लाख आणि ३ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या पिराचा माळ ते कवठे येमाई रस्त्याच्या भूमिपूजनासह २२ विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

US सिनेटमध्ये इराण युद्धाविरोधात प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

सिनेटच्या ठरावावर ट्रम्प यांची टीका; होर्मुझमधील जहाजांची वर्दळ तिप्पट,...

बरसो रे ..धरण क्षेत्रात ..मेघा..मेघा ….

पुण्यात रात्रभर ‘टिप टिप बरसा’ ; धरणांतील पाणीसाठा वाढीची...

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

सह धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश पुणे : कै. सौ. लक्ष्मीबाई...

देवेंद्र फडणविसांची तथाकथित दैवीशक्ती शेतकरी, महिला व तरुणांचे प्रश्न सोडवताना कुठे जाते?

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसचा शेतकरी मेळावा...