पुणे – स्वयंभू फाउंडेशन, शासनाची विविध महामंडळं तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे यांच्या वतीने आज (शुक्रवारी) झालेल्या पं.दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात ५३८ उमेदवारांना नोकऱ्यासाठीची नियुक्ती पत्रं देण्यात आली, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
हा मेळावा गोखले नगर येथील शहिद तुकाराम ओंबाळे मैदान, पुणे येथे झाला.
मेळाव्याला आमदार सिद्धार्थ शिरोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त, सचिन जाधव यांनी मेळाव्याचे महत्त्व प्रारंभी विशद केले.
मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील ४० उद्योजकांनी ५०४१ रिक्तपदे कळवून, सहभाग दर्शविला. ३८ उद्योजक प्रत्यक्षात उपस्थित होते. मेळाव्यामध्ये ७९१ उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यातून ५३८ उमेदवारांची निवड होऊन त्यांना नियुक्ती पत्रं देण्यात आली आणि शासनाच्या विविध महामंडळांकडे २५३ उमेदवारानी नाव नोदवून स्वयंरोजगाराचा लाभ घेतला, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यामागे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग झाला.