पुणे,: माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी तर्फे प्रथम “विश्व राजकपूर सिने रत्न गोल्डन अवार्ड” पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या वर्षी हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता व निर्माता रणधीर कपूर यांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांनी दिली.
हा कार्यक्रम ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ वा. लोणी-काळभोर येथील जगातील सर्वात मोठया तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोम मध्ये होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध फिल्म निर्माता किरण शांताराम उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रसिद्ध अभिनेता गजेंद्र चौहान, प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता व लेखक एन. चंद्रा आणि प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ काक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.