मुंबई: मुंबईतील सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारे मेसेज मुंबईच्या वाहतूक पोलिसांना मिळाले आहेत. या मेसेजमुळं मुंबई पोलीस तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना अॅलर्टचा इशारा देण्यात आला आहे.हा मेसेज कोणी पाठवला हे अद्याप कळू शकलेलं नाही, पण पोलीस याचा शोध घेत आहेत.ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.