पुणे -महापालिका हद्दी मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विविध कारवाई करणेकरिता भरारी पथकाच्या दळणवळणसाठी व दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 4 स्पेशल स्कॉड व्हेईकलची खरेदी करण्यात आली आहे. त्याचे वितरण आज महापालिका आयुक्तांच्याहस्ते करण्यात आले. आगामी काळात अजून 14 गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. दरम्यान या गाड्या दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करणाऱ्या ४ क्षेत्रीय कार्यालय म्हणजे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय,कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय, नगररोड- वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय आणि प्लास्टिक स्कॉड मुख्य मनपा भवनकार्यालय यांना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.पुणे शहरात दैनंदिन कचरा निर्मिती २२०० ते २३०० मे. टन पर्यंत होत आहे. दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणेकरिता केंद्रल शासनामार्फत घनकचरा हाताळणी नियमावली २०१६ निर्गमित केले आहे. नियमावली नुसार घनकचरा व्यवस्थापन निगडीत विविध नियमांचे पालन करणेकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वेळोवेळी कारवाई करणे अनिवार्य आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक बॅन, क्रॉनिक स्पॉट, अॅटी स्पिटिंग, ओपन डम्पिंग, वेस्ट बर्निंग इ स्वरूपाच्या विविध कारवाईचा समावेश आहे. तसेच नव्याने समाविष्ठ ३४ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ ची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विविध कारवाई करणेकरिता दैनंदिन स्थळ पाहणी करणे आवश्यक आहे. या करिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर दळणवळण करिता पुरेशी यंत्रणा उपलब्ध नाही.सद्यस्थितीत सेवकांना त्यांचेकडील दुचाकी वाहनावर जाऊन कारवाई करावी लागते जेणेकरून कारवाई प्रभावी रित्या होत नाही तसेच मुख्य खात्याकडे देखील मोठ्या कारवाया करणेकरिता वाहन उपलब्ध होत नाही.
कारवाई करणेकरिता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास एक व मुख्य खात्यास तीन असे एकूण १८ वाहन खरेदी करण्यात येणार असून पुणे शहरामध्ये विविध स्तरावर घनकचरा व्यवस्थापनाशी निगडीत विविध कारवाया प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियान मध्ये देखील पुणे शहराचे मानांकन वाढविणे करिता या उपक्रमअंतर्गत मदत होणार आहे. तसेच सेवकांना कारवाई करिता वाहने उपलब्ध करून दिल्यास त्यांचे मनोबल वाढून कारवाई प्रभावी रित्या होणेस मदत होईल व त्याचे दुरोगामी चांगले परिणाम होतील. त्यामुळे गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे.दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करणे करिता पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पहिल्या टप्यात ४ व दुसऱ्या टप्यात १४ अश्या एकूण १८ स्पेशल स्कॉड व्हेईकल खरेदी करण्यात येत आहेत. पहिल्या टप्यातील ४ गाड्यांचे वितरण आज करण्यात आले. तद्नंतर दुसऱ्या टप्यातील उर्वरित १४ गाड्यांचे वितरण क्षेत्रीय कार्यालयांना करण्यात येईल. या वेळी डॉ. कुणाल खेमनार अतिरिक्त महापालिका आयुक्त, संदिप कदम, उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन, जयंत भोसेकर, उप आयुक्त मोटार वाहन विभाग, प्रसाद काटकर, उप आयुक्त परिमंडळ क्र ४, सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त, सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. या गाड्यांद्वारे घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती सुद्धा करण्यात येणार आहे. शहराच्या सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जनजागृती करणे, वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करणे तसेच वारंवार सूचना देऊनही उल्लंघन होत असेल तर प्रशासकीय शुल्क आकारणे या बाबी अधिक प्रभावी करणे शक्य होणार आहे.