वसंत मोरेंनी महापलिका आयुक्तांना म्हटले ..बस मेट्रोने फिरा

Date:

पुणे-पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर आता पुण्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. वसंत मोरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र देत महापालिका अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, अशी मागणी केली आहे.

याबाबत वसंत मोरे यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी देशभरातील नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतील आयुक्त, वरिष्ठ अधिकारी, महापौर, समिती अध्यक्ष आणि नगरसेवक यांनी आदर्श घालून द्यावा. यासाठी सायकल, ई-सायकल, इंधनविरहित वाहने तसेच बस व मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर दैनंदिन प्रवासासाठी करावा.तसेच एकाच परिसरात राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारपूलिंग करून एकाच वाहनातून प्रवास करावा, यामुळे इंधन बचत होण्यास मदत होईल, अशीही मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या आवाहनाची सुरुवात प्रत्यक्ष कृतीतून दाखवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांनी मनपा कार्यालयात येण्यासाठी घोड्यावरून प्रवास केल्याचे मोरे यांनी सांगितले.

“प्रशासनाने स्वतः काटकसर केली तरच सामान्य नागरिकांकडून त्याची अपेक्षा ठेवण्याचा नैतिक अधिकार राहील,” असे स्पष्ट मत वसंत मोरे यांनी व्यक्त केले. मनपा प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अर्बन चॅलेंज फंडातून पायाभूत सुविधांसाठी महापालिकेला मिळणार ७१० कोटी

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे : शहर...

महाराष्ट्र होरपळणार!:राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट; पारा 46 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज

मुंबई-राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून विशेषतः विदर्भ,...

लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वत: कोरडे पाषाण ही मोदी भाजपाची स्थिती: नाना पटोले

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपा मंत्र्यांकडूनच बगल, स्वतः ऐशोआरामात राहून...

मोदींनी देशाचा तमाशा करून टाकला, आमदार जितेंद्र आव्हाड घोड्यावर स्वार होऊन म्हणाले- मोदी 2000 वर्ष मागे नेणार

PM मोदींच्या आवाहनांचा राष्ट्रवादीकडून निषेध:मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक...