· आर्थिक वर्ष 2026 साठी घोषित बोनसचा लाभ 11.89 लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना
पुणे, मे 08, 2026: भारतातील खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी आघाडीची कंपनी बजाज लाइफ इन्शुरन्सने 2025-26 (FY26) आर्थिक वर्षासाठी ₹1939 कोटी रुपयांचा विक्रमी बोनस जाहीर केला आहे, जो आजपर्यंतचा सर्वाधिक आहे. हे आर्थिक वर्ष 25मध्ये घोषित केलेल्या ₹1,833 कोटी बोनसच्या तुलनेत ही वाढ 5.8% एवढी असून, ती लक्षणीय आहे. कंपनीच्या सहभागी उत्पादनांमध्ये गुंतवणूक केलेल्या 11.89 लाख पॉलिसीधारकांना या बोनसचा फायदा होईल. सलग २५ वर्षे सातत्याने वार्षिक बोनस जाहीर करून बजाज लाइफने ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा आपला मजबूत वारसा सुरू ठेवला आहे.
31 मार्च 2026 रोजी सध्या ज्या पॉलिसी सुरू आहेत अशा ट्रॅडिशनल पार्टिसिपेटींग पॉलिसी असलेले विमाधारक हा बोनस मिळण्यासाठी पात्र आहेत; हा बोनस सहभागी निधीमधून निर्माण झालेल्या अतिरिक्त नफ्यातून जाहीर केला जातो. ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या एसीई, फ्लेक्सी इन्कम गोल, कॅश गेन, इनव्हेस्ट गेन, स्वर्ण विश्रांती, लाइफटाइम केअर, सुपर सेव्हर आणि इतर अशा अनेक प्रकारच्या सहभागी उत्पादनांची विस्तृत श्रेणी बजाज लाईफ इन्शुरन्स उपलब्ध करून देते. या योजनांचे विमाधारक, इतर लाभांसह, जाहीर करण्यात आलेल्या या बोनसचाही लाभ मिळवण्यास पात्र ठरतात.
याव्यतिरिक्त, फ्लेक्सी इनकम गोल, ACE – इन्कम, लाइफलाँग ॲश्युर आणि कॅश रिच यासारखी निवडक उत्पादने रोख बोनस लाभ देतात. पॉलिसीधारकांना हा बोनस जमा करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. पात्र उत्पादनांसाठी कंपनीने FY2025-26 साठी 6.49% संचय निधी व्याजदर घोषित केला आहे.
या घोषणेवर बजाज लाइफ इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तरुण चुग म्हणाले,
“आमच्या सहभागी पॉलिसीधारकांसाठी यावर्षी हा बोनस जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या दृष्टिकोनाचे हे सामर्थ्य आहे. तसेच आमच्या ग्राहकांना सातत्यपूर्ण मूल्य वितरीत करण्यावर आमचे सातत्यपूर्ण लक्ष दर्शवते. आमच्या ग्राहकांना त्यांच्या जीवनातील ध्येये आत्मविश्वासाने साध्य करण्यास सक्षम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
प्रत्येक आर्थिक वर्षात घोषित केलेले बोनस पॉलिसीच्या अटींनुसार पॉलिसीच्या मुदतीनुसार किंवा बाहेर पडण्याच्या वेळी वितरित केले जातात. याव्यतिरिक्त, पॉलिसीच्या वर्धापनदिनी रोख बोनस वितरित केला जाऊ शकतो किंवा संबंधित उत्पादन वैशिष्ट्यांमध्ये दर्शविल्याप्रमाणे जमा केला जाऊ शकतो.

