पुणे-सातारा रस्त्याच्या सहा पदरीकरणासह,शिरूर -अहिल्यानगर चारपदरी :राष्ट्रीय महामार्ग मार्गिकांचा आढावा

Date:

नवी दिल्ली, 4 मे 2026

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील प्रस्तावित अतिवेगवान आणि सर्वाधिक वर्दळीच्या मार्गिका आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग मार्गिकांचा आढावा घेतला.

नवी दिल्ली येथे झालेल्या या आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी अनेक प्रमुख महामार्ग विकास प्रकल्पांवर चर्चा केली. यामध्ये नागपूर-भंडारा विभागाचे सहा पदरीकरण, तळोदा-बुऱ्हाणपूर विभागाचे चौपदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियाल मार्गिका, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम ) मार्गिका, ग्वाल्हेर-नागपूर मार्गिका, नागपूर-हैदराबाद मार्गिका, भंडारा-रायपूर विभागाचे सहा पदरीकरण, लखनादौन-दुर्ग-रायपूर मार्गिका, नागपूर-अमरावती विभागाचे सहा पदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-44 वरील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमा-नागपूर बायपास-बोरखेडी टप्पा आणि पुणे-सातारा विभागाच्या सहा पदरीकरणाचा समावेश आहे.

या आढावा बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील एकूण 527 किमी लांबीच्या नऊ राज्य बीओटी (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली. या प्रकल्पांमध्ये खालील मार्गिकांचा समावेश आहे:

शिरूर-अहिल्यानगर (4-पदरी)
अहिल्यानगर-वडाळा (4-पदरी)
वडाळा-छत्रपती संभाजीनगर (4-पदरी)
छत्रपती संभाजीनगर-जालना (4-पदरी)
जालना-वाटूर (4-पदरी)
नांदेड-नरसी-देगलूर (4-पदरी आणि 2-पदरी)
जाम-वरोरा (4-पदरी)
वरोरा-चंद्रपूर-बामणी (4-पदरी)
मलकापूर-चिखली (2-पदरी)

रस्तेमार्गांद्वारे संपर्कव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी जलद करण्यावर या आढावा बैठकीत भर देण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘गंगामातेने मला बोलावलं होतं आणि आता सगळीकडे कमळच!’ पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

"गंगोत्रीपासून गंगा सागरपर्यंत सगळीकडे कमळ"दिल्ली: आजचा दिवस ऐतिहासिक आणि...

व्यंगरेषांतून उमटणार विचाररेखा ; पुण्यात रंगणार आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव

पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन ; ४२ देशांतील २९१...

कात्रज-येरवडा ट्वीन टनेलच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन संस्था निर्माण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पीएमआरडीए व पुणे महापालिकेला संयुक्तपणे कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई,...