६३ वीज कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव

Date:

महावितरणमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

पुणे, दि. २ मे, २०२६- महावितरणच्या रास्तापेठ येथील परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परिमंडलातील ६३ वीज कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट यंत्रचालक व उत्कृष्ट तंत्रज्ञ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता शैलेश जैन, सतीश खाकसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्य अभियंता काकडे म्हणाले, ‘वीज कर्मचाऱ्यांचा ग्राहकांशी थेट संबंध येतो. त्यांच्या कामावरच महावितरणची प्रतिमा अवलंबून असते. सर्वांनी ग्राहकाभिमुख होऊन ग्राहक तक्रारींचा वेळेत निपटारा करावा व कंपनीचा महसूल वाढवावा.’

वर्षभरात सरस कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महावितरण दरवर्षी पुरस्काराने गौरव करते. त्यासाठी मुख्यालयाने लावलेल्या निकषांधारे कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. यावर्षी ६३ कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला. यामध्ये १२ यंत्रचालक तर ५१ तंत्रज्ञांचा समावेश आहे. पुरस्कारार्थींपैकी हरिष बोळे, मनोज केदार, कल्पना घोडके व विकास नवले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन महेश कारंडे यांनी केले.

पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांची नावे खालील प्रमाणे –

यंत्रचालक: (विभागातून एक)

राहूल आहेर (मंचर विभाग), संतोष साकोरे (राजगुरुनगर विभाग), शितल पाटील (मुळशी विभाग), कृष्णा रामलर (रास्तापेठ), नंदु अहिरे (नगररोड), महेश ढाके (पर्वती), तुषार नलवडे (पद्मावती), तानाजी चंद (बंडगार्डन), सुधीर नागरे (भोसरी), सचिन सातपुते (कोथरूड), सुमेध नागवंशी (पिंपरी), ज्ञानेश्वर कळमकर (शिवाजीनगर) यांना उत्कृष्ट यंत्रचालक म्हणून गौरविण्यात आले.

तांत्रिक कर्मचारी : (उपविभागातून एक)

बब्रुवान गायकवाड (नारायणगाव), अनिल ठाकरे (मंचर), शेषराव आघाव (घोडेगाव), प्रविण पावरा (आळेफाटा), देविदास गव्हाळे (जुन्नर), सागर जोरी (वडगाव मावळ), पृथ्वीराज गुंडरे (लोणावळा), संदिप सरवदे (तळेगाव), दादू भोईर (राजगुरुनगर), अनंत देवकुळे (चाकण), मिलिंद भदर्गे (चाकण MIDC), मंगेश सुतार (पिंपरी), महेश जवळगे (हडपसर), पुरुषोत्तम खाडे (उरुळी कांचन), अमरनाथ कांबळे (मुळशी), किशोर हरिहर (पुणे चाचणी विभाग), मंगेश घोडे (रास्तापेठ), पंकज उमाळे (सेंटमेरी), सुर्यसेन कांबळे (कसबापेठ), विठ्ठल सोनटक्के (नगररोड), धर्मराज घुगे (विश्रांतवाडी), दिपक पवार (वडगावशेरी), नामदेव ताते (विश्रांतवाडी), प्रमोद इंगळे (वडगाव), हरिष बोळे (पेशवेपार्क), एकनाथ विघ्ने (नांदेडसिटी), शंकर मापारी (स्वारगेट), दिनेश पवार (धनकवडी), अफजल मुजावर (फायरब्रिगेड), मनोज बडंबे (मार्केटयार्ड), चंद्राकांत वायबसे (कात्रज), सचिन ठाकुर (हडपसर औद्योगिक), विकास नवले (हडपसर), राहुल सुरवसे (वाडिया), सुर्यमाला बनसोडे (आयबीएम), नितिन खाटपे (चाचणी विभाग), राजाराम रावते (भोसरी -१), मनोज केदार (भोसरी -२), भाग्यवान वनघरे (आकुर्डी), विजयकुमार मुदगुन (प्राधिकरण), चंदर चौधरी (डेक्कन जिमखाना), नवनाथ देवकर (कोथरूड), ज्योती कोल्हे (वारजे), जयदीप शिंदे (चिंचवड), केदा महाले (खराळवाडी), सौरभ लांजेवार (सांगवी), दत्तात्रय ढवाण (हिंजवडी), कल्पना घोडके (औंध), शिवराज दुसेवार (गणेशखिंड), सीताबाई बुरुड (शिवाजीनगर), बालाजी सुर्यवंशी (गणेशखिंड चाचणी) यांना उत्कृष्ट तंत्रज्ञ म्हणून गौरविण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, मुलगी 15 आठवड्याची गर्भवती

पुणे- एका अल्पवयीन मुलाने जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन...

कुटुंबातील ज्येष्ठांना वृद्धाश्रमात धाडणे हे कोणत्याही सुसंस्कृत शहराला शोभणारे नाही – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना मदतीचा हात पुणे-क्रिएटिव्ह फाउंडेशन सातत्याने...

3 वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या

पुणे-पुण्यातील चाकण औद्योगिक पट्ट्यातील दक्षिण महाळुंगे परिसरातून एक धक्कादायक...