‘शहाजीराजे’ सिनेमाची घोषणा

Date:

गोंधळ’नंतर संतोष डावखर यांची नवी ऐतिहासिक कलाकृती!

महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर मराठी चित्रपटसृष्टीत एक दमदार घोषणा करण्यात आली आहे. संतोष डावखर यांचा ‘गोंधळ’ चित्रपट झेप घेत असतानाच आता ते प्रेक्षकांसाठी आणखी एक भव्य ऐतिहासिक पर्व घेऊन येत आहेत. डावखर फिल्म्स प्रस्तुत आणि संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘शहाजीराजे’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये शहाजीराजांचा भव्य, गंभीर आणि राजेशाही अंदाज पाहायला मिळत असून, त्यातून चित्रपटाच्या दिमाखदार मांडणीची झलक दिसते. पोस्टरमध्ये चेहऱ्यामागे वाहणारा वारा त्या काळातील रणभूमीची तीव्रता आणि संघर्षाची जाणीव अधिक ठळकपणे करून देतो. शहाजीराजे भोसले यांची यशोगाथा सांगणारा हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट असून पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण झाली आहे.

संस्कृती आणि इतिहासाशी घट्ट नातं जपणाऱ्या विषयांवर काम करण्यासाठी ओळखले जाणारे संतोष डावखर यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकारत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कर्तृत्व, शौर्य आणि विचारांचा ठसा प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे.

‘गोंधळ’नंतर संतोष डावखर पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या आणि आशयघन विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, ‘शहाजीराजे’ हा चित्रपट २०२७ साली प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट तब्बल ६ भाषांमध्ये सादर केला जाणार असून, मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या भव्य चित्रपटात शहाजीराजेंची भूमिका नेमकी कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या कलाकाराची वर्णी लागणार असल्याचेही बोलले जात आहे. ‘गोंधळ’प्रमाणेच थरार आणि भव्यतेचा अनुभव ‘शहाजीराजे’मध्ये पाहायला मिळेल का, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना लागून राहिली आहे. इतिहासाची भव्यता आणि संस्कृतीचा गौरव मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, ’’महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने ‘शहाजीराजे’ची घोषणा करणं आमच्यासाठी खूप खास आहे. आपल्या इतिहासातल्या अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी शहाजीराजे हे अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, जो आम्ही अभिमानाने प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत. नेहमीप्रमाणेच आम्ही आपल्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी जोडलेली कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत.’’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा- हर्षवर्धन सपकाळांची घोषणा.. विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी पहा

मुंबई-विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू...

एमआयटी-एडीटी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन क्रीडा हंगामाचा दिमाखदार समारोप

१८ क्रीडा प्रकार, १९०८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; स्कुल ऑफ कम्प्युटिंग अव्वल,...

“श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१ जूनपासून एसटीच्या सर्व उपहारगृहांत ४० रुपयांत चहा-नाश्ता वल्लभनगर बसस्थानकाची...

‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी पुणे, दि....