एमआयटी-एडीटी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन क्रीडा हंगामाचा दिमाखदार समारोप

Date:

१८ क्रीडा प्रकार, १९०८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; स्कुल ऑफ कम्प्युटिंग अव्वल, वेदांत हिरुळकर व सई मोहिते उत्कृष्ट खेळाडू

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ दरम्यान आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत क्रीडा संस्कृतीला चालना दिली. अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या जोरावर विद्यापीठाच्या सर्व घटक संस्थांमध्ये एकूण १८ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धांमध्ये तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, बुद्धिबळ, क्रिकेट, क्रॉस कंट्री, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, रोईंग, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलीबॉल, वॉटर पोलो आणि योगा या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धांना १५ विविध संस्थांमधील १९०८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेत विजेते आणि उपविजेते खेळाडूंना एकूण ८१ सुवर्ण व ८१ रौप्य पदकांचे वितरण करण्यात आले. एकूण कामगिरीच्या आधारे एमआयटी स्कूल ऑफ कम्प्युटिंग (एसओसी) यांनी २१ सुवर्ण व १४ रौप्य पदकांसह प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांनी १९ सुवर्ण व २१ रौप्य पदकांसह द्वितीय स्थान मिळवले, तर एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (आयओडी) यांनी १७ सुवर्ण व ९ रौप्य पदकांसह तृतीय स्थान मिळवले.

एमआयटी एसओसीचा वेदांत संजय हिरुळकर याला ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू’ तर एमआयटी एसबीएसआरची सई सुधीर मोहिते हिला ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. 

स्पर्धेचे पारितोषिक वितरण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड, ब्रिगेडीअर मंगेश विटेकर यांच्या उपस्थित पार पडले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘शहाजीराजे’ सिनेमाची घोषणा

गोंधळ’नंतर संतोष डावखर यांची नवी ऐतिहासिक कलाकृती! महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर...

“श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!”— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

१ जूनपासून एसटीच्या सर्व उपहारगृहांत ४० रुपयांत चहा-नाश्ता वल्लभनगर बसस्थानकाची...

‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लोणावळा बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी पुणे, दि....

पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवा – महापौर नागपुरे यांचे निर्देश

पुणे: पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या...