पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचा मध्यरात्री छापा:15 बांगलादेशींसह अल्पवयीन मुलीची सुटका

Date:

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील ‘डिस्को’ आणि ‘माचीस’ या इमारतींवर मध्यरात्री छापा टाकत एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 15 बांगलादेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. एकूण 18 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात 11 महिला, 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. ही मोहीम सोमवारी रात्री 11.30 वाजता सुरू होऊन मंगळवारी पहाटे 5 वाजेपर्यंत चालली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवार पेठेतील या दोन इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्याव्यवसाय सुरू होता. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी 15 जण मूळचे बांगलादेशातील रहिवासी आहेत. यामध्ये बोर्ना खानुम (प्रियंका), सोमैय्या अख्तर, रय्या प्रवीण, पारुल खातून, लवली खातून, रुना शेख, तस्लिमा शेख यांसारख्या महिलांचा समावेश आहे, ज्या देहविक्रीच्या व्यवसायात गुंतल्या होत्या.

या कारवाईत 15 वर्षे 4 महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली, जिला बळजबरीने या व्यवसायात ढकलण्यात आले होते. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, या बांगलादेशी नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे नाहीत.

या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुमित मिलिंद चव्हाण (रा. मंगळवार पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, या व्यवसायावर देखरेख ठेवणारी ‘अक्का’ उर्फ ज्योती (सबिना अस्लम शेख) आणि समीर मुस्तफा हवालदार व राहुल वीरेंद्र शर्मा या दोन मॅनेजर्सनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या सर्वांचे मोबाइल फोन आणि हिशोबाच्या डायऱ्या जप्त केल्या आहेत. या डायऱ्यांमधून या व्यवसायाचे जाळे कोठपर्यंत पसरले आहे, याचा तपास केला जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये महिलांव्यतिरिक्त मोहीदुल शेख आणि सोझोल आलम फकीर या पुरुषांचाही समावेश आहे. पुणे पोलिस आता मानवी तस्करी आणि पासपोर्ट कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्वाचे : राज्यपाल...

‘… तर आपल्या पक्षाचा विस्तार वेगाने करणे हेच उद्दिष्ट’

केंद्रीय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे प्रतिपादन पुणे...

सेवा हक्क दिनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सन्मान

पुणे- महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी...