महिला नगरसेविका व पदाधिकारी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न; जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी कार्यक्रमाच्या मालिकेचे डॅा.नीलम गोऱ्हे तर्फे नियोजन
मुंबई, दि. २७ : शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महिला आघाडीच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे कसे राबवता येईल याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ आणि ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती तळागाळातील गरजू महिलांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. या योजनांमुळे अनेक गरजू नागरिकांना थेट मदत मिळू शकते, त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रिय राहून या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच, कार्य करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यशाळेत ‘आनंद दिघे नागरी सहायता कक्ष’ अंतर्गत नागरिकांच्या तक्रारी व अर्जांचे निवारण करण्याची पद्धत सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आली. त्याचबरोबर ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’अंतर्गत वैद्यकीय मदतीसाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, महिला संघटन अधिक बळकट करून विभागातील सामाजिक कार्यांना गती देण्यासाठी आवश्यक दिशा देण्यात आली.
कार्यशाळेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाबत श्री. रामहरी राऊत यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मोफत आरोग्य सेवा, कॅशलेस योजना तसेच महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या उपचार सुविधांबाबतही त्यांनी माहिती दिली. यासोबतच, या योजनांमध्ये कुठलीही अडचण आल्यास ओम पालकर (८६५७०६१५१५), रवी ननावरे (८९०७७७६५५०) आणि रामहरी राऊत (८९०७७७६००४) या क्रमांकांवर संपर्क साधून शिवसेनेतर्फे मदत व माहिती मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यातील विविध हॉस्पिटलमध्ये वेळ न मिळाल्यास रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी विशेष समन्वय व्यवस्था उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष आणि एस.आय.आर. (Special Intensive Revision) प्रक्रियेबाबत श्री. शेखर परदेशी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एस.आय.आर. म्हणजे मतदार यादीचे विशेष सखोल पुनरावलोकन असून, BLO मार्फत केलेल्या पडताळणीद्वारे मतदार यादी अचूक व त्रुटीमुक्त ठेवण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ECI NET ॲपविषयीही माहिती दिली.
या कार्यशाळेला शिवसेना उपनेत्या कला शिंदे, सुशीबेन शहा, कांदिवलीच्या नगरसेविका दीक्षा कारकर, ॲडव्होकेट संगीता चव्हाण (महिला संपर्कप्रमुख, बीड-धाराशिव), बोरिवलीच्या नगरसेविका संध्या दोषी, चाकणच्या नगराध्यक्ष please put names of Manchar Chakan put Mumbai together अंधेरी पश्चिमच्या माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच मागाठाणे विभाग प्रमुख मीना पानमंद उपस्थित होत्या. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. याशिवाय बीड, सांगली जिल्ह्यांसह विविध ठिकाणांतील उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख तसेच मुंबईतील विधानसभा प्रमुख, विभाग प्रमुख आणि महिला संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनिता मोरे (संपर्कप्रमुख, सांगली) यांनी केले. ही कार्यशाळा महिला आघाडीच्या कार्याला नवी दिशा देणारी ठरली असून, जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केला.

