रायपूर : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत 13 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर, तीन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे . नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या टेकुलागुडेम गावात नव्याने स्थापन केलेल्या सुरक्षा छावणीवर हल्ला केला. त्यावेळी 13 पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही छावणी स्थानिक जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली होती.बस्तरमधील टेकलगुडेम येथील पोलीस छावणीवर मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. तर 14 जवान जखमी झाले आहेत. जखमींना प्रथम हेलिकॉप्टरने जगदलपूरला आणण्यात आले. येथून त्यांना रायपूरला नेण्यात येत आहे. 2021 मध्ये टेकलगुडेममध्येच नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 23 जवान शहीद झाले होते.
मंगळवारी कोब्रा/STF/DRG टीम जोनागुडा-अलिगुडा परिसरात शोध घेत होती. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान नक्षलवाद्यांनी घात घातला आणि टीमवर गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.