मुंबई- येथे आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासह एनडीए विरोधी रणनिती निश्चित करण्यात आली असून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मविआमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अधिकृतपणे समावेश झाला आहे. येणाऱ्या 2 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या मविआच्या बैठकीत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर स्वतः सहभागी होणार आहेत.
बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले की, सकाळपासून प्रदीर्घ चर्चा झाली आहे. आमच्या महाविकास आघाडीमध्ये सीपीएम, सीपीआय, आप, जनता दल युनायटेड, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी या सगळ्यांचा समाविष्ट महाविकास आघाडीत झाला आहे. त्यामुळे आघाडी अधिक मजबूत झालेली आहे.
वंचित बहुजन आघाडीत नेते योग्य वागणूक दिली नाही, असा आरोप केला. बैठकीच्या ठिकाणी आल्यानंतर ते व्यवस्थित बसले होते. प्रत्येक चर्चेत सहभागी झाले होते. त्यामुळे तुमच्यापर्यंत चुकीची माहिती दिली गेली असावी, असे संजय राऊत म्हणाले.मुंबईतील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची आज बैठक पार पडली. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (ठाकरे गट) हे मविआतील 3 प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. शिवसेनेकडून या बैठकीला खासदार संजय राऊत व विनायक राऊत तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड व कॉंग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची उपस्थिती होती. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील प्रतिनिधी सहभागी झाले होते. जागावाटपासंदर्भात या चर्चा झाली. तसेच वंचितचा मविआत समावेश केला जावा, या ठरावावर चर्चा झाली. यासंदर्भात स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मविआ मध्ये समावेश झाल्याची अधिकृत घोषणा केली.