पिंपरी, पुणे (दि.३० जानेवारी २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) माहिती तंत्रज्ञान विभाग आणि आयईईई (IEEE) पुणे सेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.२) एक दिवसीय ब्लॉकचेन विषयी तज्ञ मार्गदर्शकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन गुगल फॉर्म द्वारे विद्यार्थी, शिक्षक नावनोंदणी करू शकतात. ब्लॉकचेन संदर्भातील नवीन संकल्पना, ब्लॉकचेन क्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्या इंडस्ट्री मधील तज्ज्ञांशी संवाद साधणे त्याचप्रमाणे, प्रत्यक्ष ब्लॉकचेन क्षेत्रात काम करत असताना अनुभवांचे आदान-प्रदान, मार्गदर्शन या परिषदेत होईल अशी माहिती समन्वयक, माहिती तंत्रज्ञान पीसीसीओई विभागप्रमुख आणि आयईईई (IEEE) पुणे सेक्शन ब्लॉक चेन ग्रुपच्या चेअरपर्सन डॉ. सोनाली पाटील यांनी दिली आहे.
या परिषदेमध्ये डॉ. रमेश रामदास (अध्यक्ष आयईईई (IEEE) ब्लॉकचेन तांत्रिक समुदाय), डॉ. सुरेखा देशमुख (डोमेन सल्लागार), डॉ. राजेश इंगळे (डीन प्रा. सीएसई आयआयआयटी (CSE IIIT) नया रायपूर), डॉ. पद्मजा जोशी (ज्येष्ठ संचालक सीडॅक मुंबई), डॉ. बी. के. मूर्ती, (माजी वरिष्ठ संचालक, मंत्रालय भारत) यांचे मार्गदर्शन अभ्यागतांना मिळणार आहे. तसेच कमलेश नागवारे (सहसंस्थापक एफएसवी कॅपिटल), श्रीकांत कुलकर्णी (मुख्य व्यवस्थापक ग्रीनहॅशेस) आदिंशी अभ्यागतांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी 9423527197 या क्रमांकावर संपर्क साधावा.
ही परिषद पीसीसीओईचे संचालक डॉ.गोविंद कुलकर्णी, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे , अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.