पुणे- वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा माल पुरवठा करणाऱ्या ट्रांन्सपोर्टचा व्यवसायातील कामगारांनी सुमारे सवाबारा लाखाच्या मालाचा अपहर करून जबरी चोरीचा बनाव केला पोलिसात तक्रार दाखल केली पण .. पोलिसांनी केलेल्या झटपट तपसत२४ तासात हा बनाव उघडा पडला आणि संबधित ‘चोरी ‘ झालेल्या मालासह चौघांना पोलिसांनी हाथकड्या घातल्या .
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’फिर्यादी यांचा ट्रांन्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते मुंबई-पुणे परिसरात मालाची वाहतुक करण्याकरीता टेंम्पो पुरवण्याचे काम तसेच वेगवेगळ्या व्यापा-यांकडून कपडे सप्लाय करण्याचे काम करीत असतात. दिनांक दि.२८/०१/२०२४ रोजी सुहाना मसाला चौक, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, हडपसर पुणे. या ठिकाणी त्यांचेकडे कामास असणारे कामगार हे त्यांचेकडील टेम्पो घेवुन माल वितरीत करण्याकरिता जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचा टेम्पो अडवुन टेम्पोमधील माल आणि मोबाईल हॅण्डसेट हे जबरदस्तीने चोरुन नेलेला होता. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं १९५/२०२४ भा.दं. वि. कलम ३९२,३४१,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक. रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी, अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपासपथक अधिकारी सपोनिरी अर्जुन कुदळे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार असे घटनास्थळी जावून गुन्ह्याचे हकिकती प्रमाणे पाहणी केली. आजुबाजुचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली परंतु काहीएक उपयुक्त माहीती मिळून आली नाही. त्यामुळे फिर्यादी यांचेकडे १ वर्षापासून काम पाहणारा कामगार वसिम खान आणि त्याचा भाऊ मेहफस खान यांच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्यांनी त्यांच्या गोवंडी मुंबई येथील सहका-यांच्या संगनमताने सदर टैम्पो व माल अपहार करून मुंबई येथे पाठवला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार अजित मदने, अनिरूध्द सोनवणे, चंद्रकांत रेजीतवाड असे मुंबई येथे जावून आरोपी व चोरीस गेले मालाचा शोध घेतला असता ते मिळून आले. आरोपी नामे १) वसिम युनुस खान, वय २७ वर्षे, रा. बांद्रा टर्मिनस बांद्रा मुंबई २) मोहम्मद मेहफुज शौकत खान, वय २५ वर्षे रा. गोवंडी शिवाजीनगर, मुंबई ३) मोहम्मद साकिब अय्याज खान, वय २४ वर्षे, रा. गोवंडी, शिवाजीनगर, फिट रोड, मुंबई ४) गुफरान मिराज खान, वय २३ वर्षे, रा. सदर यांचा दाखल गुन्हया मध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सर्व (१०० टक्के) मालमत्ता किं.रू १२,२०,०००/- ची ही हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, श्री.आर राजा यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती. अश्विनी राख हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रविंद्र शेळके पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विश्वास डगळे व संदीप शिवले यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक, अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अनिरूध्द सोनवणे, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांनी कामगिरी केली आहे.