शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे व मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात मॉलचे उद्घाटन

Date:

विकासकामांना गती देण्याचा संकल्प; स्थानिकांना आधुनिक सुविधांची उपलब्धता

पुणे, दि. १९ एप्रिल २०२६ :
पुण्यातील लोहगाव परिसरात उभारण्यात आलेल्या ‘ईशान मॉल’चा उद्घाटन सोहळा शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी उदघाटन सोहळ्यानंतर उपस्थितांशी संवाद साधत त्यांनी मॉलच्या प्रगती व भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.

उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, “पुणे शहरासह वडगाव शेरी, खराडी आणि लोहगाव परिसर झपाट्याने विकसित होत असून नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता स्थानिक पातळीवर आधुनिक सुविधा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. ‘ईशान मॉल’मुळे नागरिकांना तुळशीबागेसारख्या खरेदी सुविधा आपल्या परिसरातच मिळणार असून, हा प्रकल्प स्थानिक विकासाला चालना देणारा ठरेल.”

त्या पुढे म्हणाल्या की, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने सकारात्मक काम करणारे आनंद गोयल यांनी उभारलेला हा मॉल स्थानिकांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. नागरिकांचे प्रेम आणि सहकार्य यामुळेच असे प्रकल्प यशस्वी होतात, असेही त्यांनी नमूद केले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले. त्यांनी आनंद गोयल यांच्या कार्याचे कौतुक करत ‘ईशान मॉल’साठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला शिवसेना सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, आबा बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आनंदजी गोयल यांनी केले होते.
समारोपात सर्व मान्यवरांनी ‘ईशान मॉल’मुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

NEET आणि CBSE परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा भव्य मोर्चा

मुंबई NEET आणि CBSE परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ...

अनुसूचित जाती उपवर्गीकरण प्रक्रियेला स्थगिती द्या

'पुनर्विलोकन समिती'ची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी;...