पुणे –पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप यांना २६ जानेवारीला झालेल्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या समयी शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाल्यावर कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपण जेल मध्ये जाण्यास तयार आहोत,आपल्याविरुद्ध सरकारी कामात अडथला आणल्याचा ३५३ अन्वये खोटा गुन्हा दाखल केला आहे. शिवीगाळ केल्याचा गुन्हा अगर त्याबाबतची कारवाई केलेली नाही.आपण शिवीगाळ केली मात्र ती अॅक्शन वर रीअॅक्शन होती माझ्या समोर जर पत्रकार आणि कार्यकर्त्यांना मारहाण होत असेल तर मी काय करायचे ? पाणीपुरवठा प्रमुख यांना पाण्याच्या टाकीचे उद्घाटन घेण्याचा अधिकार कायद्याने आणि नियमाने नव्हताच,आणि महापालिकेच्या हिरवळीवर माझ्याविरुद्ध अधिकाऱ्यांनी घेतलेली सभा देखील बेकायदाच नियमबाह्य सभा होती असेही धंगेकर यांनी म्हटले आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना चप्पल फेकून मारण्याच्या प्रयत्नाबाबत माझ्यावर गुन्हा दाखल झाला अटक झाली पण त्यामुळे जलपर्णी च्या कामात ३० कोटी वाचले असाही दावा त्यांनी केला. पत्रकारांना आणि कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ द्या मग हवे तर मी शिवीगाळ प्रकरणात माफी हि मागेल असे ते म्हणाले. मला जेल मध्ये घालायचे षड्यंत्र हे भाजपचे असून या सर्वामागे भाजपा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.