हडपसरमध्ये स्कूल बस धडकली विजेच्या खांबाला -२५ जखमी

Date:

पुणे- हडपसर येथील काळेपडळ परिसरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. विजेच्या खांबाला धडकल्याने झालेल्या या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अमोल विनायक बोराटे (रा. महादेव मंदिराजवळ, काळेबोराटेनगर, हडपसर) या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसकर्मचारी नंदकुमार जावळे यांनी काळेपडळ पोलिसठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालक हडपसरमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जात होता. काळेपडळ परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. या धडकेत बसमधील 25 ते 30 विद्यार्थ्यांना दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भरधाव वेगाने बस चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बसच्या धडकेने विजेचा खांब पूर्णपणे वाकला होता. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई.दि.२४: राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि...

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार

संसदेतील सर्वोत्तम कामगिरीचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव पुणे: संसदेतील सर्वोत्तम...

सर्वधर्मसमभाव हाच खरा राष्ट्रवाद – विजय तांबे

फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित "महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद"...

केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाचे काम 20 दिवसात झाले नाही तर…नगरसेवक अजित घुलेंचा इशारा

पुणे- केशवनगर-खराडी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी २० दिवसांची मुदत देत...