पुणे : तिरंगा स्पोर्ट क्लब, हडपसर स्पोर्ट फाउंडेशन, सचिन भाऊ दोडके, वंदेमातरम् संघ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करताना शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै. शंकरराव ढमाले स्मृती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सचिन अहिर, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, नगरसेवक विशाल धनवडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख संजय मोरे, आयोजक संजय नाईक, उमेश गालिंदे उपस्थित होते.
मुलांच्या गटात तिरंगा स्पोर्ट क्लब संघाने तळजाई माता प्रतिष्ठान संघाला ५६-१८ असे एकतर्फी पराभूत करताना विजयी सलामी दिली. मध्यंतराला
सचिन दोडके संघाने २४-१० अशी १४ गुणांची आघाडी घेतली होती.
तिरंगा स्पोर्ट क्लब संघाकडून प्राची कांबळे व साक्षी चोरगे यांनी आक्रमक चढाया करताना गुणांची कमाई केली. रिया धुमाळ व वैष्णवी दारवडकर यांनी सुरेख पकडी करताना संघाच्या विजयात हातभार लावला. पराभूत संघाकडून अर्पिता बलकवडे, नुपूर देशमुख, निशा साठे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.