· मालमत्ता 9.1% p.a चे एकूण एंट्री उत्पन्न देईल आणि आपल्या गुंतवणूकदारांना 13.1% p.a. IRR चे लक्ष्य
· पहिल्या ४८ तासांत ३८ कोटी रु.हून अधिक रक्कम जमा झाली
· ही प्रॉपर्टी ५३,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली असून ५ वर्षांच्या लॉक इन आणि लीजसाठी पूर्व भाडेतत्त्वावर आहे.
पुणे 29 जानेवारी 2024: भारतातील आघाडीच्या तंत्र-प्रणीत व्यावसायिक बांधकाम व्यवसाय क्षेत्र (CRE) गुंतवणूक प्लॅटफॉर्म, स्ट्रॅटाने आज पुण्यात फ्रॅक्शनल ओनरशिपसाठी आपली सर्वात नवीन व्यावसायिक मालमत्ता, एक भव्य, ग्रेड-ए ऑफिस प्रॉपर्टी सादर करण्याची घोषणा केली. नवीन गुंतवणुकीची संधी भारतातील सर्वात मोठ्या फ्लेक्स वर्किंग स्पेससाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली असून त्यासाठी स्ट्रॅटाने एकूण ७८ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ही प्रॉपर्टी वा जागा पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे. तिचा आकार अंदाजे ५३,००० चौरस फूट क्षेत्रफळ असून ती ५ वर्षांच्या लॉक-इन आणि लीजसह येते. ही मालमत्ता 13.1% च्या एकूण IRR सह 9.1% चे एकूण एंट्री उत्पन्न सादर करेल अशी अपेक्षा आहे. सादर झाल्यापासून पहिल्या ४८ तासांत, ३८ कोटी रु.हून अधिक रक्कम आधीच जमा झाली आहे.
क्वीन ऑफ डेक्कन अशा पुण्याच्या मध्यभागी प्रख्यात माहिती तंत्रज्ञान उपनगर विमान नगर येथे ही प्रॉपर्टी व्यावसायिक लँडस्केप्सच्या संपूर्ण परिसंस्था आणि आगामी मेट्रो लाइनने वेढलेली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून सर्वत्र उत्तम दळणवळण सेवा आहे. या सर्व-समावेशक, महत्वपूर्ण स्थानामुळे भाडेकरूनी एकूण पूर्व- भाडेतत्वावरील कालावधीसाठी मालमत्तेचा ताबा निश्चित केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ते अधिक सुरक्षित आहे.
या सादरीकरणाबद्दल बोलताना स्ट्रॅटाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन लोढा म्हणाले, “सर्वात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक क्षेत्रांपैकी एकामध्ये आमची नवीनतम मालमत्ता घेऊन येताना आम्ही खूपच उत्सुक आहोत. ही मालमत्ता म्हणजे धोरणात्मक स्थान, उच्च- दर्जेदार मालमत्ता आणि उद्योगातील आघाडीचे भाडेकरू यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. यातून या महत्त्वाकांक्षी शहरात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूकीची इष्टतम संधी तयार होते.”
“सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आमच्या गुंतवणूकदारांच्या अतूट विश्वासामुळे आम्ही १३०० कोटी हून अधिक एयूएम पार करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. या निमित्ताने मी माझी टीम आणि गुंतवणूकदारांचे सततच्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो,” असेही ते पुढे म्हणाले.
भारतातील अत्याधुनिक व्यावसायिक मालमत्ता ए श्रेणी मध्ये रिटेल गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांमध्ये स्ट्रॅटाने बंगळुरू, चेन्नई, होसूर, जयपूर, हैदराबाद, पुणे इ. मध्ये एकाधिक प्रीमियम मालमत्ता सुरू केल्या आहेत.
स्ट्रॅटा त्याच्या स्थापनेपासून भारतात अंशात्मक मालकीचा एक मजबूत नवीन मालमत्ता वर्ग तयार करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यायोगे उच्च श्रेणीचे, मर्यादित प्रवेश CRE गुंतवणूकीचे सार्वत्रिकीकरण करत आहे. या प्रयत्नांमुळे, स्ट्रॅटाने एक लाख हून अधिक वापरकर्ते आणि 3000 हून अधिक सक्रिय गुंतवणूकदार यांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवून स्वत:ला सिद्ध केले आहे. अंदाजे 25% एनआरआय गुंतवणूकदारांच्या आधारावर भारतीय बांधकाम क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी स्ट्रॅटा मदत करत आहे. स्ट्रॅटाला कोटक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स, ग्रुहास प्रॉपटेक, सेबर इन्व्हेस्टमेंट्स एलिव्हेशन कॅपिटल, मेफिल्ड आणि प्रॉपस्टॅक सारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचे पाठबळ आहे.