पुणे-उत्तम गायनासाठी सूर, ताल, उच्चार, सौफ्लदर्यशास्त्राचा अभ्यास आणि सादरीकरणाबरोबर ‘भाव’ महत्त्वाचा असतो. त्यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे असे मत ज्येष्ठ गायीका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी व्यक्त केले.
व्यक्ती आणि अभिव्यक्तिचा अनोखा मिलाफ असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘मुक्तछंद’ या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन फेणाणी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फेणाणी यांची मुलाखत घेण्यात आली.फेणाणी म्हणाल्या, शालेय अभ्यासक्रमात शास्त्रीय संगीताचा समावेश केला पाहिजे. आईच्या गर्भात असल्यापासून संगीताचे संस्कार झाल्यास ते झिरपत जातात. त्यासाठी दिग्गज कलाकारांची गाणी ऐकली पाहिजेत.डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद कांबळे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुशीलकुमार धनमने यांची प्रमुख उपस्थिती होती.फर्ग्युसनच्या सांस्कृतिक विभागाच्या वाटचालीत विशेष योगदान देणाऱ्या डॉ. सविता केळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सायली भगवानकर या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. डॉ. धनमने यांनी प्रास्ताविक केले. सानंता तुळजापूरकर या विद्यार्थिनीने मुलाखत घेतली.
उत्तम गायनासाठी ‘भाव’ महत्त्वाचा-पद्मजा फेणाणी जोगळेकर
Date: