~ प्रदेशातील ऑटो आणि इंजिनिअरिंग ग्राहकांना सेवा देण्यासाठी या सुविधेचा पहिला टप्पा २०२४ च्या अखेरीस कार्यान्वित होईल; ~
पुणे, 29 जानेवारी, 2024 : महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (MLL) ही भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक लॉजिस्टिक सोल्युशन्स पुरवठादारांपैकी एक कंपनी असून, कंपनीने पुण्याजवळील फलटण येथे त्यांच्या अत्याधुनिक वेअरहाउसिंग सुविधेचे सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. ६.५ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या सुविधा दोन टप्प्यांत विकसित केल्या जातील. ३.५ लाख चौरस फुटांचा पहिला टप्पा २०२४ च्या अखेरीस कार्यान्वित होणार आहे.
फलटण येथे २५ एकर परिसरात पसरलेला हा वेअरहाऊसिंग प्रकल्प महिंद्रा लॉजिस्टिक लि.च्या देशव्यापी मल्टी-क्लायंट सुविधांच्या नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग असेल. ऑटो OEM आणि घटकांमधील प्रमुख ग्राहकांच्या जवळ असलेले फलटण हे एक मोक्याचे ठिकाण आहे. या भागातील ऑटोमोटिव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील विविध क्लायंटचे अंतर्गत लॉजिस्टिक आणि निर्मिती तथा वितरणाची व्यवस्था या वेअरहाऊसद्वारे महिंद्रा लॉजिस्टिक पाहणार आहे. महिंद्रा लॉजिस्टिक लि.च्या गोदामांचे राष्ट्रीय नेटवर्क, संपूर्ण ट्रक लोड आणि एक्सप्रेस पार्सल सेवेशी हा वेअरहाऊसिंग प्रकल्प जोडला जाईल. उत्पादन करणाऱ्या ग्राहकाशी पहिला टप्पा करारबद्ध करण्यात आला आहे आणि ते त्यांचे राष्ट्रीय लॉजिस्टिक केंद्र म्हणून काम करेल आणि २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होईल.
या प्रदेशातील लॉजिस्टिक सेवा प्रदात्यांच्या सर्वात मोठ्या गोदामांपैकी सर्वा मोठी सुविधा येथे असेल. महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडच्या शाश्वतता मानकांनुसार याचे डिझाइन केली जाईल. यामध्ये डीकार्बोनायझेशन, अक्षय उर्जेचा वापर, हरित गोदाम मानकांचे पालन आणि स्थानिक समाज विकासात सक्रिय सहभाग यासारख्या उपायांचा समावेश आहे. या घोषणेचा एक भाग म्हणून, महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. कौशल्य विकास उपक्रमांसाठी संसाधने समर्पित करण्याचीदेखील योजना आखत आहे. त्यामुळे प्रदेशातील ५०० हून अधिक व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. नवीन सुविधा आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या अनेक टप्प्यांतील विकासासाठी कंपनी आणि तिचे भागीदार १७० कोटी भांडवल रुपये गुंतवणार आहेत.
महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले की, “आमची क्षमता वाढवण्यासाठी आणि वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतभर आमचे मल्टी-क्लायंट वेअरहाउसिंग नेटवर्क विस्तारत आहोत. फलटणमधील आमची नवीन सुविधा या प्रदेशातील आमच्या मौल्यवान ग्राहकांसाठी एकूण व्यवसाय परिसंस्था वाढवण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या ठरवलेली आहे. ही वेअरहाऊसिंग प्रकल्प आमच्या मल्टी-क्लायंट सुविधा, एक्सप्रेस आणि संपूर्ण ट्रकलोड ऑपरेशन्सच्या आमच्या राष्ट्रीय नेटवर्कशी जोडली जाईल. त्यामुळे परिसरातील ग्राहकांची रिच वाढेल आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. यामुळे जागतिक दर्जाचे, तंत्रज्ञानावर आधारित उपाय देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला मूर्त रूप मिळते आणि २०२४ पर्यंत कार्बन तटस्थता प्राप्त करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी संरेखित करते.