फॉरेन्सिक ऑडीटनुसार बँकेच्या ठेवीदारांच्या २९१ कोटी २५ लाखाच्या रकमेचा अपहार झाला असून, या गुन्ह्यात अनिल कोठारी व मनेष साठे यांचा सक्रिय सहभाग आहे, त्यामुळे दोघेही या अपहारास जबाबदार आहेत. २ एप्रिल २०१६ रोजी साठेयांच्या खात्यात रोख स्वरुपात ६ लाख रुपये जमा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नगर:नगर अर्बन बँकेच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणीआर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले अनिल कोठारी व मनेष साठे या दोन माजी संचालकांना विशेष न्यायालयाने ७ दिवसांची(२ फेब्रुवारीपर्यंत) पोलिस कोठडीसुनावली. विशेष न्यायाधीश प्रशांत शिंत्रे यांनी शनिवारी हे आदेश दिले. फॉरेन्सिक अहवालातून या दोघांच्या खात्यात कर्जदारांच्या खात्यातून पैसे वर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुरुवारी (२५ जानेवारी) सायंकाळी अनिल कोठारी व मनेष साठे या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आर्थिक गुन्हेअन्वेषण शाखेचे उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी दिली होती. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने दोघांनाही जिल्हा रुग्णालयातउपचारांसाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने शुक्रवारी (२६ जानेवारी) सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यातआले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनीत्यांना लगेच अटक केली व शनिवारी सकाळी न्यायालयासमोर हजर केले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, की दोन्ही आरोपींच्या खात्यावर कर्जदारांच्याखात्यातून पैसे वर्ग झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात आलेल्या या पैशांसह अन्य पैशांचे व्यवहार तपासायचे आहेत. या रकमा त्यांच्या खात्यात कोठून, कोणी व का पाठवल्या, याची माहिती घ्यायचीअसल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व कुटुंबीयांची चौकशी सुरू असून, अन्य संचालकांसहअधिकाऱ्यांचाही शोध सुरू असल्याचेतपासी अधिकारी खेडकर यांनी सांगितले.
दोन्ही संचालकांचे वैयक्तिक व्यवहारअसल्याचा आरोपींच्या वतीने वकिलांनी केला. त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस दिली नाही, जबाब घेतले नाहीत. पूर्वी ज्यांना नोटीसा दिल्या, त्यांच्यावर कारवाई नाही.तसेच आरोपींना नोटीसा न देता त्यांच्यावरथेट कारवाई केल्याचे म्हणणे आरोपींच्या वकिलांनी मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तीवादऐकल्यावर न्यायालयाने अनिल कोठारी वमनेष साठे यांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलिसकोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.