देशात भाजपाविरोधी वातावरण निर्माण करण्याकरता देशातील विरोधकांची मोट बांधण्याचं काम करणाऱ्या नितीश कुमारांनी या विरोधकांच्या एकजुटीला इंडिया आघाडीचं नाव देण्यात आल्यानंतरही या आघाडीत अग्रभागी राहण्यात धान्यात मानली होती . परंतु,आता त्यांनी इंडिया आघाडीलाच डच्चू देत एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जेडीयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आज महाआघाडीपासून फारकत घेत एनडीएमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. नितीश कुमार यांच्यासोबत आणखी आठ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांचाही समावेश आहे.
नितीश कुमारांनी आज (२८ जानेवारी) नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या १० वर्षांत त्यांनी पाच वेळा वेगवेगळ्या आघाडी आणि युतीसह सत्ता स्थापन केली होती. तर, २०२२ मध्ये त्यांनी एनडीएची साथ सोडून राजद-काँग्रेसच्या महागंठबंधन सरकारमध्येही ते मुख्यमंत्री बनले होते. तर, आता दोनच वर्षांत त्यांनी महागठबंधनची साथ सोडून पुन्हा एनडीएला जवळ केले आहे. म्हणजे दोन वर्षांत त्यांनी दोनदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
नितीश कुमार म्हणाले, आम्ही आधी भाजपाबरोबर युती केली होती. ती युती तोडून यांच्याबरोबर (राजद) आघाडी बनवली. परंतु, इथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हतं. आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो.
महाराष्ट्राप्रमाणे २ उपमुख्यमंत्री – नितीश यांच्यासह एकूण 8 मंत्र्यांनी शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री
1. सम्राट चौधरी (भाजप) 2. विजय सिन्हा (भाजप)
मंत्री
3. डॉ. प्रेम कुमार (भाजप)
4, विजेंद्र प्रसाद (जेडीयू)
5. श्रवण कुमार (JDU)
6. विजय कुमार चौधरी (JDU)
7. संतोष कुमार सुमन (हम)
8. सुमित सिंह (अपक्ष)