मराठे तहात हरले नाहीत, तुम्हाला तह कळतो का? असा सवाल करतानाच पोरं गेले आणि आरक्षण घेऊन आले,
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणानंतर गरज नसताना काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या स्पष्टीकरनंतर मनोज जरांगे पाटील यांनी एका मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. परिणामी येणाऱ्या काळात फडणवीस विरुद्ध जरांगे असा वाद असल्याचे आजपर्यंत स्पष्ट झाल्याचे दिसत आले आहे
मनोज जरांगे पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आंतरवाली सराटीसह राज्यात मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असल्याचे आश्वासन सरकारने दिल्याचे तुम्ही म्हणता. पण सरसकट गुन्हे मागे घेणार नाही, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर तुमचं मत काय आहे? असा सवाल मनोज जरांगे यांना करण्यात आला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता, मग हे आंदोलन सुरू राहणार आणि आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आमचा दणका सुरूच राहील, असा इशाराच जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिला.
99 टक्के आरक्षण मिळाले आहे. पण एक टक्का राहिले आहे. सरकारला माझी विनंती आहे जे राजपत्र काढले. आता त्याची उद्यापासून अंमलबजावणी करण्यात यावी, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. मराठे तहात हरले नाहीत, तुम्हाला तह कळतो का? असा सवाल करतानाच पोरं गेले आणि आरक्षण घेऊन आले, असे जरांगे म्हणाले.
मराठे शांतपणे मुंबईला गेले आणि शांततेत परत आले. त्यांचे कौतुक करतो. कायदा बनवताना सरकारने 15 दिवस वेळ घेतला. सरकारने तज्ज्ञांची मदत घेतली. विरोधक विरोध करत असतात. विरोध करणाऱ्याला शांततेत उत्तर देणार आहोत, असेही ते म्हणाले.
अधिसूचनेवर ते हरकती घेत असतील तर आपण पण हरकती घेतल्या पाहिजेत. आपल्याला चार गोष्टी करायच्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचा मोठा प्रश्न होता. आपल्याला राजपत्र मिळाले आहे, आता त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे, असंही ते म्हणाले.
राज्यात विदर्भात मराठ्यांना 80 ते 82 टक्के आरक्षण आहे. वरच्या मराठ्यांना काही नाही. पश्चिम महाराष्ट्रात 45 टक्के आरक्षण आहे. कोकण आणि खानदेशात आरक्षण कमी आहे. त्या भागात 100 टक्के आरक्षण नाही. त्यामुळे नोंदी सापडतात. त्यामुळे तो आकडा जास्त निघतो. मराठवाड्यात कसरत करावी लागते. मलाही गैरसमज होता. नव्या की जुन्या नोंदी हे मीही सरकारला विचारलं.
या नोंदी नव्या की जुन्या हे मी ही जबाबदारीने सांगत नाही. त्यांनी आकडा दिला. 57 लाख नोंदी सापडल्या असं सरकारने सांगितलं. आंतरवलीहून मुंबईला जाईपर्यंत हा आकडा आला. 39 लाख प्रमाणपत्रही वाटप केले आहे. सर्व आकडे नवे आहेत. याबाबत गैरसमज होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.