विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले मान्यवरांचे स्वागत.
मुंबई दि.२७: विधानभवनात आजपासून तीन दिवसीय ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष मा. श्री. ओम बिर्ला व राज्यसभा उपसभापती मा. श्री. हरिवंश यांचे आगमन झाले. याप्रसंगी, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यसभा उपसभापती मा. श्री. हरिवंश यांचे व विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी लोकसभेचे अध्यक्ष मा. श्री. ओम बिर्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.