पुण्यात एनडीआरएफचे ‘मोबिलायझेशन ड्रिल’; ‘पीडीआरएफ’ची दमदार कामगिरी!

Date:

पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाची आपत्ती व्यवस्थापन सज्जता सिद्ध!

पुणे: “कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, मात्र ती आल्यावर होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ‘सज्जता’ हाच एकमेव पर्याय असतो.” याच ब्रीदवाक्याला जागत, पुण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातर्फे (NDRF) ‘वार्षिक मोबिलायझेशन ड्रिल २०२६’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सरावात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) अग्निशमन विभागाने म्हणजेच ‘पीडीआरएफ’ (PDRF) ने सक्रिय सहभाग नोंदवत, बचावकार्याचे उत्कृष्ट कौशल्य प्रदर्शित केले.

दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकूण १० वेगवेगळ्या ठिकाणी हे ड्रिल राबवण्यात आले. यामध्ये एनडीआरएफसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केले. विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक भक्कम करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेत पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या (पीडीआरएफ) टीमने तीन प्रमुख ठिकाणच्या बचावकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. अत्यंत कठीण परिस्थितीत नागरिकांचे प्राण कसे वाचवावे, याचे दर्शन प्रात्यक्षिकांमधून घडवण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने जलमय भागातील बचाव (पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे तंत्र), ‘रोप रेस्क्यू’ द्वारे उंच इमारती किंवा खोल दरीतून अडकलेल्यांची सुटका करणे, तसेच रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक (CBRN) आपत्तींचा सामना करण्याची तांत्रिक तयारी यांबाबतची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये, लोणावळा येथील टायगर पॉईंट येथे रोप रेस्क्यूचे प्रात्यक्षिक घेण्यात आले, तर लोणी काळभोर येथे सीबीआरएन (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर) आपत्ती व्यवस्थापनाची मॉक ड्रिल पार पडली. तसेच, मुळशी धरण परिसरात वॉटर रेस्क्यूचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

“आपत्ती कोणतीही असो… सज्जता, समन्वय आणि टीमवर्क हाच यशाचा मंत्र आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देऊन नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.”

— देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीडीआरएफ (पीएमआरडीए, पुणे)

काय आहे पीडीआरएफ (PDRF)?

पीडीआरएफ हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) अग्निशमन विभागाचे विशेष पथक आहे. पीएमआरडीएचा विस्तार पुणे जिल्ह्यात मोठा असल्याने, या भागातील औद्योगिक वसाहती, आयटी पार्क्स आणि वाढते नागरीकरण लक्षात घेऊन या दलाची निर्मिती करण्यात आली आहे. पीएमआरडीए अंतर्गत येणारी गावे, महापालिका हद्दीबाहेरील विकसित भाग आणि पुणे जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हे दल सदैव सक्रिय असते.
हे दल केवळ आग विझवण्यापुरते मर्यादित नसून; भूकंप, पूर किंवा रासायनिक गळतीसारख्या मोठ्या आपत्तींमध्ये ‘फर्स्ट रिस्पॉन्स टीम’ म्हणून काम करते. पीडीआरएफचे जवान एनडीआरएफच्या धर्तीवर प्रगत शोध आणि बचाव (Search and Rescue) कार्याचे प्रशिक्षण घेतलेले आहेत. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफाडे यांच्या नेतृत्वात हे दल कार्यरत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पुणे : एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे. वाहनाच्या...

ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी...

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा निर्णय

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध.. पुणे:...

रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणामध्य...